चित्रपट निर्मितीसाठी अनेक महिने, कधी कधी वर्षे लागतात. मात्र, तमिळ चित्रपटसृष्टीने 1999 मध्ये असा एक विक्रम केला, ज्याची आजही जगभर चर्चा होते. ‘सुयमवरम’ या तमिळ चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अवघ्या 24 तासांत पूर्ण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरही मोठा यशस्वी ठरला आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात कमी वेळात पूर्ण झालेल्या फीचर फिल्म म्हणून त्याची नोंद झाली.