सोलापूरच्या मोहोळमध्ये शेतकऱ्याच्या विहिरीतच आढळली मगर, वनविभागाकडून बचाव मोहीम राबवण्यात येणार


Solapur : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात धक्कादायक घटना गडली आहे. मोहोळमधील कोरवलीत शेतकऱ्याच्या विहिरीत चक्क मगर आढळल्याची घटना समोर आली आहे. कोरवली गावातील संभाजी जमदाडे यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी सायंकाळी मोठी मगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्युत पंप बंद करण्यासाठी गेलेल्या संभाजी जमदाडे यांना विहिरीच्या कड्यावर मगर दिसली. त्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामस्थ आणि वनविभागाला माहिती दिली आहे. 

 मगरीला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाकडून बचाव मोहीम राबवण्यात येणार 

वनविभागाच्या हेल्पलाइनसह संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, बुधवारी रात्री उशिरापर्यंत बचाव पथक घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. गुरुवारी सकाळी मगरीला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाकडून बचाव मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. मागील वर्षी सीना नदीला आलेल्या महापुरातून पाणी कालव्यात शिरल्याने ही मगर त्या प्रवाहातून कोरवली परिसरात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन महिन्यांपूर्वीही कालवा परिसरात मगर दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता मात्र त्यावेळी ती घोरपड असल्याचा समज झाल्याने दुर्लक्ष झाले होते.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *