दरवाजा उघडला… कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकले… आणि सुंदर साडीत, नेहमीसारखाच मोहक हरियाल माधुरी दीक्षित मदरसाला पुढच्या काही सेकंदांत ‘माधुरी… माधुरी!’ असा जल्लोष करत संपूर्ण बॉलरूम अक्षरशः दणाणून गेलं. ‘माँ बहन’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात चित्रपटाचा ट्रेलर जितका चर्चेत होता, त्याहून अधिक चर्चा रंगली ती अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या अफाट क्रेझची !
सिनेमासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माधुरीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. ती मंचावर येताच वातावरणात अचानक एक वेगळीच ऊर्जा संचारली. तिच्या प्रत्येक हसण्यावर आणि बोलण्यावर चाहत्यांकडून टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा वर्षाव होत होता.
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःचं सौंदर्य जपणारी माधुरी या कार्यक्रमातही तितकीच देखणी दिसत होती. ग्लॅमर, आत्मविश्वास आणि सहजता यांचा परफेक्ट मिलाफ म्हणजे माधुरी, याची पुन्हा एकदा प्रचीती आली. विशेष म्हणजे, ‘माँ बहन‘मधील भूमिकेसाठी तिनं भोजपुरी भाषेचाही अभ्यास केला आहे. ट्रेलरमध्ये तिच्या तोंडी असलेले भोजपुरी संवाद आणि तिचा सहज वावर पाहून उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत दाद दिली.
Mangesh Desai: ”धर्मवीर’च्या तिसऱ्या भागाचं नाव बदलणार, धक्कादायक वास्तव समोर आणणार , निर्माते मंगेश देसाईंचा मोठा खुलासा, Dharmaveer 3 ची उत्सुकता वाढली ‘भोजपुरी भाषा शिकताना मजा आली. प्रत्येक शब्दाचा टोन आणि लय समजून घ्यावी लागली. मी ती भाषा बोलताना नैसर्गिक वाटावं, अशी माझी इच्छा होती’, असं माधुरीनं सांगितलं. तर आपल्या व्यक्तिरेखेविषयी ती म्हणाली, ‘ही फक्त एका आईची गोष्ट नाही. आपल्या मुलीसाठी कोणत्याही परिस्थितीत उभी राहणाऱ्या स्त्रीची ही कथा आहे. तिच्यात ताकद गोंधळ, भावना आहेत आणि थोडासा वेडेपणाही!’ आपल्या मुलीसाठी सतत झगडणारी, परिस्थितीशी भिडणारी आणि तरीही आयुष्याकडे हसत पाहणारी आई तिनं साकारली आहे. तिच्या व्यक्तिरेखेत भावनिक छटा आहेतच; पण त्यासोबत हट के दृष्टिकोनही दिसतो. ‘माँ बहन’चा ट्रेलरही नेहमीच्या क्राइम ड्रामांपेक्षा वेगळा वाटतो. आदर्श कॉलनीतील काही महिलांच्या आयुष्यात अचानक घडणारी घटना, त्यातून निर्माण होणारा गोंधळ, नात्यांमधील संघर्ष आणि त्यात मिसळलेला भन्नाट विनोद अशा अनेक स्तरांवर कथा फिरताना दिसते.
‘परफेक्ट’च्या चौकटीत स्त्री अडकलीय ‘स्क्रीनवर स्त्री म्हणजे समजूतदार, शांत, सगळं परफेक्ट सांभाळणारी दाखवली जाते. पण प्रत्यक्ष आयुष्यात प्रत्येक स्त्री गोंधळते, थकते, चुका करते’, असं माधुरी म्हणाली. तर तृप्ती डिमरी सिंगल मदरविषयी म्हणाली, ‘समाज अजूनही त्यांना वेगळ्या नजरेनं पाहतो. त्यांच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जातात. ‘माँ बहन’ त्या समाजाला दिलेलं उत्तर आहे.’
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा