Hollywood Director Christopher Nolan Movies: 28 वर्षांत 13 सिनेमे, 51,000 कोटींचं कलेक्‍शन; या सुपरहिट दिग्दर्शकाचे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर पाहिलेत?


Hollywood Director Christopher Nolan Movies: हॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) यांचा बहुप्रतिक्षित ‘द ओडिसी’ (The Odyssey) हा चित्रपट 17 जुलै 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नोलन यांच्या कारकिर्दीची चर्चा रंगली आहे. अवघ्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत  13 चित्रपट दिग्दर्शित करूनही त्यांनी जगभरात 6.1 अब्ज डॉलर्स म्हणजे  सुमारे 51 हजार कोटी इतकी कमाई केली आहे.

सिनेविश्वातील सर्वात प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक

30 जुलै 1970 रोजी जन्मलेले ख्रिस्तोफर एडवर्ड नोलन हे ब्रिटिश-अमेरिकन लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. गुंतागुंतीच्या कथा, वेगळं कथन आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी मांडणी ही त्यांची खास ओळख आहे. आजपर्यंत त्यांनी 2 ऑस्कर, 2 बाफ्टा आणि 1 गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावले आहेत. त्याचबरोबर त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी नामांकनही मिळालं आहे. 2015 मध्ये ‘टाईम’ मासिकाने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला, तर 2024 मध्ये त्यांना ‘नाईट’ ही मानाची पदवी देण्यात आली.

नोलन यांच्या चित्रपटांची जगभरात कोट्यवधींची कमाई

ख्रिस्तोफर नोलन यांचे चित्रपट केवळ समीक्षकांच्याच नव्हे, तर बॉक्स ऑफिसवरही तुफान यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या सर्व चित्रपटांनी मिळून आतापर्यंत 6.1 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 51 हजार कोटी इतकी कमाई केली आहे.

द डार्क नाईट रायझेस (2012) : 1.085 अब्ज डॉलर (सुमारे 9,070 कोटी)

द डार्क नाईट (2008) : 1.004 अब्ज डॉलर (सुमारे 8,390 कोटी)

ओपेनहायमर (2023) : 976 दशलक्ष डॉलर (सुमारे 8,160 कोटी)

इन्सेप्शन (2010) :836 दशलक्ष डॉलर (सुमारे 6,990 कोटी)

इंटरस्टेलर (2014): 773 दशलक्ष डॉलर (सुमारे 6,460 कोटी)

लहानपणापासूनच चित्रपटनिर्मितीची आवड

नोलन यांनी लहान वयातच लघुपट बनवण्यास सुरुवात केली होती. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे इंग्रजी साहित्याचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म्स तयार केल्या.1998 मध्ये ‘Following’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर ‘Memento’ (2000) या चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेच्या ऑस्कर नामांकनाचाही मान मिळाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *