मावशीचा जीव वाचला अन् 124 वेळा केलं रक्तदान, ‎श्रीकांत यांनी समाजासमोर ठेवला आदर्श, Video पाहुन कराल कौतुक | आरोग्य बातम्या


Last Updated:

श्रीकांत चौधरी यांनी तब्बल 124 वेळा रक्तदान आणि एसडीपी दान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. 

+

News18

News18

छत्रपती संभाजीनगर : एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी केलेले एक रक्तदानही अनमोल असते. मात्र छत्रपती संभाजीनगर येथील श्रीकांत सुधाकरराव चौधरी यांनी तब्बल 124 वेळा रक्तदान आणि एसडीपी दान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

‎श्रीकांत चौधरी मूळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. ते नोकरीनिमित्त गेल्या वीस वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात आहेत. सध्या ते जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग-1), सहकारी संस्था, नांदेड या पदावर कार्यरत आहेत. श्रीकांत चौधरी यांनी आतापर्यंत सुमारे 105 वेळा एसडीपी दान आणि 15 ते 16 वेळा संपूर्ण रक्तदान केले आहे. एकूण 124 वेळा रक्तदान केलेले आहे.

‎श्रीकांत चौधरी यांनी 1996 मध्ये त्यांच्या मावशीची तब्येत अत्यंत खराब होती, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. त्यावेळेस त्यांचं वय साधारणपणे 25 वर्षे असेल. गंभीर आजारपणात प्रथम रक्तदान केले. त्या वेळी त्यांच्या एका रक्तदानामुळे त्यांच्या मावशीचा जीव वाचला आणि त्यांना खूप समाधान मिळालं. त्यानंतर त्यांना रक्तदान करायचं महत्त्व समजलं.

त्यानंतर त्यांनी आजपर्यंत सातत्याने रक्तदान करत आहेत. सन 2008 पासून त्यांनी नियमितपणे रक्तदान आणि एसडीपी दान सुरू ठेवले. गरजू रुग्णांना वेळेत रक्त आणि प्लेटलेट्स उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने त्यांनी अनेक वेळा तातडीच्या परिस्थितीतही रक्तदान केले. रक्तदान करण्याबरोबरच श्रीकांत चौधरी यांनी अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजनही केले आहे. तसेच आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांना आणि इतर नागरिकांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेकांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *