ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुरुषांच्या टी 20 आणि वनडे  वर्ल्ड कपच्या फॉरमॅटमध्ये धक्कादायक बदल केले आहेत. आयसीसी बोर्डाच्या एडिनबर्ग येथील वार्षिक बैठकीत मुख्य कार्यकारी कमिटीच्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला. वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपमधील स्पर्धाक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. वनडे वर्ल्ड कपमध्ये सुपर -7 आणि टी 20  वर्ल्ड कपमध्ये सुपर 10 आणि एलिमिनेटरची एंट्री होईल. वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका,  झिम्बाब्वे आणि नामीबियामध्ये होणार आहे. तर, 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 वर्ल्ड कप होईल. 

वनडे वर्ल्ड कपमध्ये सुपर -7

वनडे वर्ल्ड कपमध्ये 14 संघ सहभागी होतील.  12 व्या, 13 व्या आणि 14 व्या क्रमांकावरील संघांची एक सुपर सिरीज खेळवली जाईल. यामध्ये विजेतेपद मिळवणारा  संघ दुसऱ्या राऊंडमध्ये पोहोचेल. दुसऱ्या राऊंडमध्ये 12 संघांची दोन गटात विभागणी केली जाईल. दोन्ही गटांमध्ये 6-6 संघ असतील. दुसऱ्या राऊंडमध्ये 30 सामने खेळवले जातील. दोन्ही गटातील टॉपवरील प्रत्येकी तीन संघ आणि  राहिलेल्या 6 संघातील सर्वोत्तम कामगिरी करणारा एक संघ असे एकूण 7 संघ सुपर -7 साठी पात्र ठरतील. सुपर-7 राऊंडमध्ये 21 सामने खेळवले जातील. राऊंड रॉबिन सुपर -7 मधील टॉप चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. पहिल्या स्थानावरील आणि चौथ्या स्थानावरील संघात  उपांत्य फेरीचा सामना होईल. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना होईल. पुरुषांच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये 57 सामने होतील. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेत्या संघांमध्ये अंतिम सामना होईल. 

टी 20 मध्ये सुपर-10 आणि एलिमिनेटर

आयसीसी पुरुष टी 20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी होतील आणि 55 सामने होतील. यावेळी चार चार संघांचे पाच ग्रुप असतील.  प्रत्येक टीमधील 2 संघ सुपर-10 मध्ये पोहोचतील. ज्यामुळं पहिल्या स्टेजमधील सामन्यांची संख्या 30 होईल. यानंतर सुपर-10 मधील संघांना 5-5 संघांच्या दोन गटात विभागलं जाईल. यामध्ये 20 लढती होतील. दोन्ही गटात पहिल्या स्थानावर असलेले संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तर, दोन्ही गटात दुसऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये दोन एलिमिनेटरचे सामने खेळवले जातील. दोन एलिमिनेटरमध्ये विजयी झालेले संघ उपांत्य फेरीत पोहचतील. त्यानंतर उपांत्य फेरीत विजयी झालेले संघ अंतिम सामना खेळतील. 

टी 20 वर्ल्ड कपला पात्र ठरलेले 14 संघ : अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे

ग्लोबल क्वालिफायरमधून 8 संघांची निवड 16 संघांतून केली जाईल.  कॅनडा, इटली, नामिबिया, नेपाळ, नेदरलँडस, ओमान, यूएई आणि अमेरिका यांना ग्लोबल क्वालिफायर खेळावे लागतील.  आफ्रिका, आशिया, यूरोप मधून प्रत्येकी दोन संघ, अमेरिकेतून एक आणि एशिया पॅसिफिक मधून एक संघाची निवड होईल.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *