सध्या तापमान खूपच वाढलेलं आहे. या वाढत्या तापमानात उष्माघात होण्याची खूप शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊनच नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन केले जाते. परंतु उन्हामध्ये काही गोष्टींचीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
कारण या गोष्टींची काळजी न घेतल्यास त्या उन्हामुळे, गर्मीमुळे फुटण्याची शक्यता असते. या वस्तू नेमक्या कोण-कोणत्या आहेत, त्या जाणून घेऊ या. ज्वलनशील पदार्थांची उन्हात सर्वाधिक काळजी घेतली पाहिजे. यात गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, पेंट हे पदार्थ ज्वलनशील असल्याने त्यांना उन लागू नये म्हणून योग्य त्या ठिकाणी ठेवणे गरजेचे असते.
टीव्ही, लॅपटॉप, मोबईल फोन आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही काळजी घेतली पाहिजे. कारण उन्हामुळे या इलेक्ट्रॉनिग उपकरणांतील सामान खराब होण्याची शक्यता असते. या उपकरणांत बॅटरी असेल तर ती खराब होऊ शकते. त्या बॅटरीचा स्फोटही होऊ शकतो. त्यामुळे उन्हात हे उपकरणं चांगले ठेवले पाहिजेत.
उन्हाळ्यात तुम्ही घेत असलेल्या औषधांचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण काही औषधं ही उन्हामुळे खराब होण्याची शक्यता असते. खराब झालेली ही औषधं तुम्ही घेतल्यास तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच उन्हाळ्यात औषधांचीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
तुमच्या घरात एखादी बॅटरी, पॉवर बँक असेल तर त्याचेही उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. कारण उन्हामुळे बॅटरी आणि पॉवर बँकमधील घटक खराब होऊ शकतात. खूपच जास्त तापमान असेल तर ही उपकरणं फुटूही शकतात. म्हणूनच त्यांना उन लागता कामा नये.




