Tejashree Pradhan Buys New Luxury Mercedes Car: मराठी टेलिव्हिजनवरची (Marathi Television Industry) आघाडीची अभिनेत्री (Marathi Actress) म्हणून ओळखली जाणारी तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) लाखो चाहत्यांच्या काळजाची धडकन आहे. तेजश्री प्रधाननं आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलंय. आपल्या भूमिकांमुळे तेजश्रीनं फार कमी वेळातच मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनात आपल्या हक्काचं असं अढळ स्थान निर्माण केलंय. ‘होणार सून मी ह्या घरची’ (Honaar Soon Mee Hyaa Gharchi), ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Gosht), ‘अग्गबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai) अशा बऱ्याच लोकप्रिय मालिकांमधून तेजश्रीनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली. तसेच, तिनं अनेक नाटकांमध्येही काम केलंय. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणाऱ्या तेजश्री प्रधाननं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. तेजश्रीच्या आयुष्यात एक नवी पाहुणी आली असून याबाबत तिनं पोस्ट करत चाहत्यांना गोड सरप्राईज दिलंय.
तेजश्री प्रधान हिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक गूड न्यूज शेअर केलीय. तेजश्रीने तिच्या Birthday Month मध्ये नवीन गाडी खरेदी केली आहे. तसा तेजश्रीनं गाडी घेऊन महिना उलटलाय, तिनं महिन्याभरानं आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तेजश्रीनं मर्सिडीज कार खरेदी केली आहे. ड्रायव्हिंग सीटवर बसून तिनं स्वतःचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोत गाडीचं लक्झरी इंटिरिअर आणि सनरूफ सुद्धा पाहायला मिळतंय. तसेच, फोटोतल्या गाडीच्या स्टिअरिंगवर मर्सिडीज कारचा लोगो दिसतोय. तेजश्री आरामात तिच्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलीय. पिस्ता रंगाच्या साडीत तेजश्री खूपच सुंदर दिसतेय. महत्त्वाची बाब म्हणजे, तेजश्रीची नवीकोरी आलिशान गाडी तिनं स्वतःला दिलेलं बर्थडे गिफ्ट असून तिनं तिच्या Birthday Month मध्ये नवीन गाडी खरेदी केली आहे.
तेजश्री प्रधानची सोशल मीडिया पोस्ट (Tejashri Pradhan Social Media Post)
तेजश्री प्रधान हिनं पोस्ट शेअर करुन आपल्या गाडीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तेजश्रीनं लिहिलंय की, “.. आणि जवळपास एक महिना उलटून गेलाय… माझा प्रवास आता अधिक सुखद होत चालला आहे!” आपल्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिलेल्या कॅप्शनच्या पुढे तेजश्रीनं Evil Eye इमोजी पोस्ट केला आहे. त्यासोबतच तिला दिलेल्या आनंदी आयुष्यासाठी देवाचे आभार मानायलाही तेजश्री विसरलेली नाही.
सुबोध भावेची कमेंट चर्चेत (Subodh Bhave Comment On Tejashri Pradhan Post)
तेजश्रीनं नव्या गाडीसोबतचा फोटो शेअर केल्यावर तिच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडलाय. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिनं कमेंट करत म्हटलंय की, “Yee वेलकम टू द क्लब… तुझं अभिनंदन!” तर, सुबोध भावेनंही तेजश्रीच्या पोस्टवर कमेंट केलीय. सुबोध भावेनं लिहिलंय की, “अरे कधी घेतलीस नवीन गाडी??????? MY GOD ……अभिनंदन”. तसेच, इतर सेलिब्रिटींनीही तेजश्रीच्या पोस्टवर कमेंट करत तिचं अभिनंदन केलंय.
दरम्यान, तेजश्री प्रधान सध्या झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ (Veen Doghantali Hi Tutena) मध्ये झळकते. तेजश्रीची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि सुबोध भावेची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेत तेजश्री स्वानंदीची भूमिका आणि सुबोध भावे समर राजवाडेंची भूमिका साकारतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :