Hema Malini Accepts Dharmendras Padma vibhushan: देशातील मानाच्या आणि महत्त्वाच्या नागरी पुरस्कारांचं म्हणजेच पद्म पुरस्कारांचं आज दिल्लीत वितरण करण्यात आलं. हा सोहळा बॉलिवूडसाठी भावुक असा ठरला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी यांनी स्वीकारला. हा सोहळा देओल कुटुंबियांसाठी अत्यंत भावूक करणारा होता.
मुलगी अहाना देओलला अश्रू अनावर
जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेल्या, तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेली त्यांची मुलगी अहाना देओल आपल्या अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ इथं आयोजित नागरी अलंकरण सोहळ्यात जेव्हा धर्मेंद्र यांच्या नाव पुकारण्यात आलं, तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या कडकडाट झाला.हेमा मालिनी यांनी अत्यंत आदरानं आणि जड अंतःकरणानं राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांनी हलक्या गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हेमा मालिनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. आज संपूर्ण देश आनंदी आहे. धरमजी आज आपल्यात असते, तर त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांना पाहून त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला असता. हा सन्मान खूप आधीच मिळायला हवा होता, पण भारत सरकारनं त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाचा हा मोठा गौरव केल्याबद्दल मी केंद्र सरकारची आभारी आहे.
भारतीय सिनेमाचा अजरामर ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील एका युगाचा अंत झाला. ६ दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा