1,53,00,00,000 रुपयांची जिंकली लॉटरी, पण बाईचं नशीब फारच वाईट, हातात आले 0 रुपये! | व्हायरल न्यूज (Viral News in Marathi)


Last Updated:

पैशांच्या बाबतीत तर प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो. आपल्याला एखादी लॉटरी लागावी आणि कोट्यवधी रुपये आपल्याकडे यावे म्हणजे, आरामात आयुष्य जगता येईल. पण….

News18
News18

‘देव देतो पण कर्म नेते’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. एखाद्याचं नशीब अचानक पालटतं पण हाती आलेली संधी गमावणाऱ्यांच्या यादीमध्ये आपल्याकडे माणसांची कमी नाही. बरे जण असे असतातही काम होण्याआधी गावभर सांगून येतात आणि नंतर कामच होतं नाही. पैशांच्या बाबतीत तर प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो. आपल्याला एखादी लॉटरी लागावी आणि कोट्यवधी रुपये आपल्याकडे यावे म्हणजे, आरामात आयुष्य जगता येईल. पण, हे एका महिलेसोबत घडलं सुद्धा, या महिलेला तब्बल 153 कोटींची लॉटरी लागली. पण कोट्याधीश झालेली ही महिला अवघ्या तासाभरात पुन्हा गरीब झाली,

त्याचं झालं असं की, सन नावाच्या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये साउथ वेल्स भागामध्ये राहणाऱ्या  कैथ नावाच्या एका महिलेला लॉटरी काढण्याचा छंद जडला होता. मागील 20 वर्षांपासून ही महिला लॉटरीचं तिकीट खरेदी करत होती, एक दिवस तरी आपली लॉटरी लागेल असं तिला वाटत होतं. पण, अखेर तो दिवस 6 जून रोजी उजाडला. या महिलेला तब्बल 12 मिलियन पाउंड म्हणजे, जवळपास 153 कोटींचा जॅकपॉट लागला. पण, कैथने जे तिकीट काढलं होतं ते तिने कचऱ्यात फेकून दिलं होतं, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सध्या हे वृत्त सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे, न्यूज18 मराठी याबद्दल पुष्टी देत नाही.

20 वर्षांनंतर पालटलं नशीब

कैथ मेन ही महिला ब्रिटनमधील  साउथ वेल्स भागातील एबरसीनन परिसरात एका रग्बी क्लबमध्ये ट्रेजरर  म्हणून काम करतेय. मागेल अनेक वर्षांपासून कैथ ने आपल्या आईच्या नावाने तिकीट खरेदी करत होती. तिला 6 नंबरवर विश्वास होता. त्यामुळे ती नेहमी 6 नंबराशी जुळता एखादं तिकीट खरेदी करत होती. 6 जून रोजी लॉटरीचा ड्रॉ निघाला. पण, कुणीच या लॉटरीबद्दल क्लेम केलं नाही, मग कैथने आपल्या लॉटरीचा नंबर चेक केला.

लॉटरी जिंकली 

जेव्हा कैथने लॉटरीच्या नंबरची पडताळणी केली तेव्हा तिला विश्वासच बसला नाही. तिचा नंबर हा विनिंग नंबर होता. मग काय कैथ आनंदाने उड्या मारायला लागली. तिने लगेच आपली आई फियोना यांना फोन केला आणि तिकिटाबद्दल माहिती दिली. पण, आईने जे सांगितलं ते ऐकून तिला धक्का बसला.

आईने तिकीट कचऱ्यात फेकून दिलं

खरंतर कैथच्या आईने जे तिकीट खरेदी केलं होतं ते चेक करण्यासाठी ती लॉटरी सेंटरवर गेली होती. तिथे तपासलं असता इलेक्ट्रिक मशीनने कोणतेही सिग्नल दिले नाही. ब्रिटनमध्ये लॉटरीवर एक कोड असतो, ज्यामुळे मशीनमध्ये स्कॅन केल्यावर अलर्ट मिळतो. पण, त्या दिवशी मशीनमध्ये असं काही घडलं नाही. त्यानंतर लॉटरी सेंटर कैथच्या आईने तिकीट हे कचऱ्यामध्ये फेकून दिलं.

आता कैथ धावत लॉटरी सेंटरवर आली तिने  लॉटरी ऑपरेटर कंपनी ऑलविन (Allwyn) शी संपर्क साधला. कंपनीला सांगितलं की, त्या नंबरची लॉटरी आमच्याकडे आहे. कंपनीनेही विश्वास ठेवला. त्यांनी तपासणी केली. बऱ्याच वेळा ग्राहकाकडून तिकीट हे गहाळ होतं, त्यामुळे कंपनी ग्राहकांना काही पुरावा मागत असते. कंपनीने लॉटरी सेंटरवरील सगळे सीसीटीव्ही तपासले. कैथच्या आईने कुठे तिकीट फेकलं का हे पाहिलं.  लॉटरी दुकानाचा मालक   करण कुमार याचीही चौकशी झाली. पण, दुकानाच्या आतमध्ये कोणतेही सीसीटीव्ही फुटेज नव्हते. स्कॅनिंग मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे असं घडलं असेल, असं त्यांनी सांगितलं. एवढंच नाहीतर दुकानातला कचरा जिथे फेकला जातो, तिथेही पाहणी केली. पण, सगळा कचरा आधीच फेकून देण्यात आला होता. त्यामुळे कैथ जिंकूनही परेशान झाली आहे.

कंपनीने 30 दिवस थांबायचं सांगितलं

दरम्यान, लॉटरी कंपनीने कैथची सगळी हकीकत ऐकल्यानंतर दिलासा दिला आहे.   कंपनीकडून तपास सुरू असून ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे कैथला आता 30 दिवस वाट पाहावी लागणार आहे.

मराठी बातम्या/Viral/

1,53,00,00,000 रुपयांची जिंकली लॉटरी, पण बाईचं नशीब फारच वाईट, हातात आले 0 रुपये!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *