Video : विधवा आणि घटस्फोटीत महिला म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी अन्…, मुस्लीम इन्फ्लुएन्सरच्या वादग्रस्त विधानावर उर्फी जावेदचा संताप – Marathi News | Adnaan shaikh controversial statement on widow and divorcee women urfi javed anger on it


सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा महिलांवर होणाऱ्या आपत्तिजनक टिप्पणीवर संताप व्यक्त करत स्वतःचं स्पष्ट मत मांडलं आहे. आता उर्फी जावेद हिने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख याला चांगलंच सुनावलं आहे… सांगायचं झालं तर, सध्या अदनान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने विधवा आणि घटस्फोटीत महिलाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. विधवा आणि घटस्फोटीत महिला म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी… असं वक्तव्य अदनान याने केलं आहे. ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावाल लागत आहे…

13 जुलै 2026 रोजी अदनान शेखचा व्हायरल झालेला व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्यानंतर उर्फी जावेदने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. संताप व्यक्त करत उर्फी म्हणते, “अशा लोकांना बोलण्याची परवानगीच का दिली जाते?” तिची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाली. अनेक युजर्सनीही तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं आणि महिलांबाबत अशा भाषेचा वापर करणं अस्वीकार्य असल्याचं म्हटलं आहे.

महिलांबद्दल अदनान शेख असं म्हणाला तरी काय?

अदनान शेख याने नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. ‘विधवा आणि घटस्फोटीत महिलांच्या दुसऱ्या लग्नावर स्वतःचं मत व्यक्त करत अदनान म्हणाला, ‘समाज अशा महिलांचं लग्न होऊ देत नाही… लग्न झालं नाही म्हणून अशा महिलांना “पब्लिक प्रॉपर्टी” होऊ देणं योग्य आहे का? पुरुष जर अशा महिलांसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे, तर त्यामध्ये हरकत काय आहे.’ स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी अदनान याने महिलांसाठी “पब्लिक प्रॉपर्टी” या शब्दाचा वापर केला आणि यामुळे वाद सुरु झाले आहेत.

सोशल मीडियावर नव्या वादाला सुरुवात

अदनान शेख याच्या वादग्रस्त विधानानंतर, सोशल मीडियावर लोकांनी त्याचा निषेध केला; महिलांचा अपमान करणारे आणि त्यांना केवळ ‘वस्तू’ म्हणून सादर करणारं विधान असल्याचं सांगत त्यावर टीका केली. अनेक नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, जरी त्यांचा उद्देश पुनर्विवाहाचा असला, तरी त्याने वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह होती आणि ती महिलांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारी होती. सांगायचं झालं तर, उर्फी जावेद हिच्या प्रतिक्रियेनंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. सध्या सोशल मीडियावर अदनान याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *