Zareen Khan Slams Paparazzi: अनेकदा बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्रींचे नको त्या अँगलनं फोटो काढणं, त्यांना वारंवार रस्त्यामध्ये आवाज देऊन फोटो काढण्यासाठी भाग पाडणं, यामुळे पॅपाराझी (Paparazzi) सेलिब्रिटींच्या निशाण्यावर असतात. काही सेलिब्रिटी आणि पॅपाराझींचा तर छत्तीसचा आकडा आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर एका इव्हेंटमधला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मुंबईतील (Mumbai News) एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये चिडल्याचं पाहायला मिळतंय. झरिन खाननं (Zareen Khan) चिडून त्या पॅपाराझीला सर्वांसमोरच खडसावलं आणि स्वतःच्या तोंडावर लगाम लावण्यास सांगितलं. तसेच, असं वर्तन ती अजिबातच खपवून घेण्यार नाही, असा इशाराही तिनं दिलाय.
झरीन खान एका कपड्यांच्या ब्रँडच्या लॉन्च कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती, जिथे ती डेनिम जॅकेट आणि जीन्स वेअर करून पॅपाराझींसमोर पोझ देत होती. या कार्यक्रमादरम्यान, एका पॅपाराझीनं तिला सर्वांसमोर तो ड्रेस घालून ‘मॉडलिंग’ करण्यास, म्हणजेच रॅम्प वॉक करायला सांगितलं. त्यावेळी झरिन खानला राग अनावर झाला आणि तिनं सर्वांदेखतच त्या व्यक्तीला सुनावलं.
Zareen Khan shut down the paps 🗿🔥
The paps tried to be smart with her, but she gave it back with full savage energy.
Zareen was holding some clothes and choosing
Pap: Ye wali pehno
Zareen: Mujhe pata hai konsi pehnni hai
Pap: Hamare samne pehno
Zareen: “hadd mein raho,… pic.twitter.com/8WaL0DLneh
— Chota Don (@choga_don) July 13, 2026
झरीन खानचा पॅपाराझींवर संताप (Zareen Khan Slams Paparazzi VIDEO)
सोमवारी झरीन खान मुंबईत एका कपड्यांच्या ब्रँडच्या लॉन्च कार्यक्रमाला उपस्थित राहिली. तिथे, त्या ब्रँडचा डेनिम जंपसूट, जॅकेट आणि ड्रेस वेअर करून ती पॅपाराझींसाठी पोझ देत होती. त्याच वेळी, एका फोटोग्राफरनं तिला गंमतीनं, “ड्रेस ट्राई करके दिखाइए…”, असं म्हटलं.
पॅपाराझीनं केलेल्या मागणीनंतर संतापलेली झरीन खान म्हणाली की, “माझ्यासोबत फालतूपणा करायचा नाही… मी अशा गोष्टी सहन करणारी व्यक्ती नाही… आपल्या मर्यादेत राहायचं…”
नेटकऱ्यांकडून झरीन खानचं कौतुक
झरीन खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर अनेक लोकांनी तिच्या समर्थनार्थ आवाज उठवलाय. एका युजरनं लिहिलंय, “झरीन अगदी बरोबर बोलली आहे…” दुसऱ्या एकानं कमेंट केलीय की, “पॅपाराझी असं कसे बोलू शकतात? कॅमेऱ्यासमोर कोणी कपडे का बदलेल?” आणखी एकानं लिहिलंय की, “तिनं अगदी योग्य उत्तर दिलंय. कोणीही आपल्या मर्यादा ओलांडू नयेत…” कोणताही गोंधळ न घालता पॅपाराझींना ठामपणे सुनावल्याबद्दल युजर्स झरीनचं कौतुक करत आहेत.
आपली नाराजी मोजक्या शब्दांत कशी व्यक्त करावी, हे झरीनकडून शिकण्यासारखं आहे, असंही युजर्स म्हणालेत. झरीन खाननं 2010 मध्ये सलमान खानसोबत ‘वीर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. त्यानंतर ती ‘रेडी’ सिनेमातील ‘कॅरेक्टर ढीला’ या गाण्याव्यतिरिक्त ‘हाऊसफुल 2’, ‘हेट स्टोरी 3’, ‘अक्सर 2’, ‘1921’ आणि पंजाबी चित्रपट ‘जट्ट जेम्स बाँड’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये झळकलीय. झरीन बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे; ती शेवटची 2021 मधील ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ सिनेमात दिसलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव