Chembur School bus Accident: चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड पडून मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला होता. या अहवालात मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि एकूण प्रशासनाला क्लीनचिट देत सर्व खापर पालिकेच्या कंत्राटदारावर फोडण्यात आले होते. या अहवालावर महापौर रितू तावडे (Ritu Tawde) प्रचंड संतापल्या आहेत. त्यांनी या अहवालाच्या विश्वासर्हतेवर शंका उपस्थित करत हा अहवाल आपल्याला अमान्य असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे का, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (Mumbai news)
स्कूलबस अपघाताबाबत नेमलेल्या कमिटीचा अहवाल आलेला आहे. कंत्राटदार आणि बीएमसी यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली आहे. जो अहवाल दिलेला आहे, तो मला मान्य नाही. माझ्या पाहणी अहवालावेळी सिमेटचं पाणी खोडात जात आहे. त्यामुळे झाडं कमकुवत होऊ शकतात. पहिल्याच पावसात ते झाड स्कूल व्हॅनवर पडले. हा चुकीचा अहवाल आहे. अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारी मी महापौर नाही. जितेंद्र परदेशी असोत किंवा अन्य कोणी ते या पदावर इतकी वर्षे का आहेत, तो माहितीचा विषय आहे. मुंबईचे रस्ते 2200 रस्ते पूर्ण केलेत 250 किलोमीटर रस्ते बाकी आहेत, असे रितू तावडे यांनी सांगितले.
चेंबूर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लहान मुलाची किंमत 7 लाख रुपये इतकीच आहे का? ट्री असिसमेंट असेल किंवा इतर गोष्टी आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्व नगरसेवक किंवा अधिकारी सर्व रस्त्यावर उतरून काम करतोय. पालिका आता रस्त्यावर उतरली आहे, असेही रितू तावडे यांनी म्हटले.
BMC Report: चेंबूर दुर्घटनेच्या अहवालात नेमकं काय?
मुंबई शहरातील चेंबूर (mumbai) येथील डायमंड गार्डन परिसरात 30 जून रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड (Tree) उन्मळून पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी नियुक्त चौकशी समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात झाडांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कंत्राटदारावर 5 लाख रुपये, तर देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवर 2 लाख रुपयांचा दंड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच झाडांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करून ती तातडीने लागू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, चेंबूर झाड पडण्याच्या दुर्घटनेमध्ये रस्ते विभाग आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे.
आणखी वाचा
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया