Amitabh Bachchan Fan Faints Outside Jalsa during Sunday Darshan ; Amitabh Bachchan Sunday Darshan : अमिताभ बच्चन यांच्या रविवार दर्शन परंपरेला गालबोट, चेंगराचेंगरीत एक चाहता बेशुद्ध, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह


Amitabh Bachchan Fan Faints : अभिनेते अमिताभ बच्चन दर रविवारी आपल्या जलसा बंगल्या बाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतात. त्यामुळे दर रविवारी चाहत्यांची त्यांच्या बंगल्याबाहेर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पण या रविवारी तिथे गोंधळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

amitabh bachchan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी गेली 5 दशकांहून अधिक कालावधी इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. जगाच्या कानाकोपऱ्यात बिग बींचा चाहता वर्ग पसरलेला आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. त्यामुळे दर रविवारी मुंबईतील त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर ते स्वत:हून आपल्या चाहत्यांना दर्शन देण्यासाठी उपस्थित राहतात. रविवार हा त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. त्यांना समोरासमोर पाहून चाहते उत्साहीत होतात.

मात्र, या रविवारीच्या ‘दर्शना’दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीत एका चाहत्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, ते वेगाने व्हायरल होत आहेत. गेली अनेक वर्ष बिग बी रविवारी न चुकता आपल्या चाहत्यांना भेट देतात. तसेच अमिताभ बच्चन 24 मे रोजी त्यांच्या ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर वाट पाहत असलेल्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी बाहेर आले होते.

Maharashtra Times‘माझ्याकडे मर्सिडीज होती पण लॉकडाऊन नंतर मला सगळं विकावं लागलं’ Sanjay Jadhav यांनी सांगितला मित्रांच्या साथीचा किस्सा
व्हायरल व्हिडिओ आणि ऑनलाइन वृत्तांनुसार, गर्दीची झुंबड पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली. गर्दीच्या त्या लोटात एका चाहत्याला चक्कर येऊन तो खाली कोसळल्यानंतर परिस्थिती अत्यंत चिघळली. चेंगराचेंगरी होऊ लागली. त्यामुळे काहीतरी अघटीत घडेल या विचाराने उपस्थित लोक आणखी घाबरले. अनेक चाहते त्या व्यक्तीला पाणी देऊन आणि त्याच्याभोवतीची जागा मोकळी करून मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.

अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर एका चाहत्याला चक्कर

संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेमुळे अमिताभ बच्चन यांच्या ‘सार्वजनिक दर्शना’च्या वेळी गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Maharashtra TimesAnita kanwal : ‘देवा मला उचलं!’ काम मिळत नाही म्हणून वणवण भटकतेय ज्येष्ठ अभिनेत्री, वैतागून मनात भलतेसलते विचार

अमिताभ बच्चन ‘रविवार दर्शन’

गेली अनेक वर्षे, ‘जलसा’ बंगल्याबाहेर अमिताभ बच्चन यांचे होणारे ‘रविवार दर्शन’ हे मुंबईला भेट देणाऱ्या चाहत्यांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरले आहे. दर आठवड्याला, शेकडो चाहते अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर जमतात. त्यांना हात दाखवण्यासाठी, फोटो काढण्यासाठी आणि या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गर्दी करतात. काही चाहते तर केवळ या दिग्गज अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठीच विविध शहरे आणि राज्यांतून प्रवास करून येतात.

अमिताभ बच्चन यांची प्रकृती

रविवारचा अमिताभ बच्चन यांचा सार्वजनिक दर्शन विशेष होती; कारण आठवड्याच्या सुरुवातीलाच ते लिलावती रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण, त्यानंतर या अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करून या अफवांचे खंडन केले. त्यांची प्रकृती पूर्णपणे उत्तम असल्याचेही विविध वृत्तांतून स्पष्ट करण्यात आले.

काव्या आणि नंदिनी पैकी खट्याळ सून कोण? मानिनीनं दिलं उत्तर

अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट

अमिताभ बच्चन आता ‘कल्की 2898 AD’ च्या सिक्वेलमध्ये ‘अश्वत्थामा’ ही भूमिका साकारताना दिसतील. याशिवाय ते ‘सेक्शन 84’ या चित्रपटातही दिसणार आहे. रिभू दासगुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या ‘कोर्टरूम ड्रामा’मध्ये डायना पेंटी, निम्रत कौर आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असले, तरी त्याच्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा