IND vs ENG: गरजच काय आहे मग…पत्रकार परिषदेत गिल अचानक भडकला; सरळ खेळू नका असं कोणाला म्हणाला? – Marathi News | Shubman Gill opposes proposed 40 over ODI cricket format ahead of ind vs eng odi series


भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत तीन वनडे सामने असणार आहे. पहिला वनडे सामना आज दुपारी रंगणार आहे. भारतीय संघाने टी-20 मालिका गमावली आहे. आता वनडे मालिका जिंकणे हे त्यांचे लक्ष्य असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी बऱ्यात वेळेनंतर मैदानात उतरणार आहे. आता या सामन्याआधी पत्रकार परिषद पार पडली. यात कर्णधार शुभमन गिलने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, पण याच दरम्यान आता गिल एका प्रश्नावर रागवलेला पाहायला मिळाला.

टी-20 क्रिकेट आणि फ्रँचायझी लीगच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्यावर सातत्याने चर्चा होत आहे. अलीकडेच, एडिनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत एकदिवसीय सामने 50 षटकांवरून 40 षटकांपर्यंत कमी करण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली. मंगळवारी सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी गिल म्हणाला, “एकदिवसीय सामने 40 षटकांपर्यंत कमी केले पाहिजेत असे मला वाटत नाही. पूर्वी आम्ही अनेक त्रिकोणीय मालिका खेळायचो आणि त्या पाहण्यात खूप मजा यायची. भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांसारखे संघ ऑस्ट्रेलियामध्ये खेळायचे. तुम्ही फक्त एका संघाविरुद्ध नाही, तर दोन वेगवेगळ्या संघांविरुद्ध वेगवेगळ्या मैदानांवर खेळायचात. एकदिवसीय क्रिकेट अधिक रंजक बनवायचे असेल, तर द्विपक्षीय मालिकांऐवजी त्रिकोणीय (Triseries) किंवा कदाचित चतुष्कोणीय मालिका (Quadrangular series) आयोजित केल्या पाहिजेत. यामुळे खेळाडू आणि प्रेक्षक दोघांसाठीही हा प्रकार अधिक मनोरंजक होईल.”

गिल म्हणाला की, ” माझ्यासाठी 50 षटकांचा विश्वचषक ही अजूनही सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा आहे. मी लहानपणी सर्वाधिक 50 षटकांचे क्रिकेट पाहिले आहे. जेव्हा कधी विश्वचषकाचा उल्लेख होतो, तेव्हा सर्वात आधी 50 षटकांचा विश्वचषकच आठवतो. जर मला एक विश्वचषक जिंकायचा असेल, तर तो 50 षटकांचा विश्वचषक असेल. इंग्लंडविरुद्धची सध्याची एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिकेत 2027 मध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण आहे. विश्वचषकाची तयारी करणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दक्षिण आफ्रिकेत आम्हाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागेल, ती इथल्यासारखीच असण्याची शक्यता आहे.” त्यामुळे, आमच्यासाठी कोणते संघ संयोजन सर्वोत्तम काम करेल, हे आम्हाला तपासायचे आहे. या संदर्भात ही मालिका खूप महत्त्वाची आहे.”

गिल म्हणाला, “कर्णधार म्हणून, आतापासून प्रत्येक मालिका माझ्यासाठी महत्त्वाची असेल. विश्वचषकापूर्वी मला मिळणारा कोणताही अनुभव आणि शिकवण भविष्यात खूप उपयोगी पडेल.  नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांच्या दुखापतींमुळे संघाला अंतिम 11 खेळाडूंमध्ये बदल करावे लागले. आम्ही थोडे दुर्दैवी ठरलो. मालिकेपूर्वी रेड्डी जखमी झाला आणि राणासुद्धा उपलब्ध नाही. विश्वचषकापूर्वी या खेळाडूंनी अनुभव मिळवण्यासाठी शक्य तितके जास्त सामने खेळावेत अशी आमची इच्छा होती. त्यामुळेच आम्हाला एक वेगळे संयोजन मैदानात उतरवावे लागले, पण याचा अर्थ असा नाही की आमचा संघ अस्थिर आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *