शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिने काल गंभीर आरोप केले. या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली. काल याबाबत बोलताना विनायक राऊत दिसले. शारीरिक संबंधांवरही थेटपणे बोलताना गिरीजा राऊत दिसली. गिरीजा राऊत यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यादरम्यान आता माजी खासदार विनायक राऊत यांनी काही मोठे खुलासे केले. विनायक राऊत यांनी म्हटले की, प्रत्येकवेळी मी आईवडिलांना घेऊन जात होते. असं तिने तक्रारीत म्हटलंय. आईवडिल संज्ञान आहे. मुलगी संज्ञान आहे. त्यामुळे त्यांनी गैरप्रकार आहे. तर पोलिसांकडे का गेले नाही. गिरीजा आणि तिच्या वडिलांनी पोलिसात तेव्हाच धाव का घेतली नाही. तिने तक्रारीत म्हटलं मी स्वतहून माहेरी गेले आहे.
स्त्रीधन मी घेऊन आले आहे. यासोबतच 13 बॅग घरातून घेऊन ती निघाली. स्त्रीधन सासरी किती आणलं आणि जाताना किती घेऊन गेले हे हिंमत असेल तर सांगावं. तिला जे मिळालं ते तिचं नशीब. आम्हाला त्यात पडायचं नाही. जे मिळालं त्यात त्यांनी सुखी राहावं. त्यांच्या डिमांड दुपटीने वाढत होत्या. सुरुवातीला दोन बेडरूम मागितला. दोन कोटी रुपये वरून पाच कोटी मागितले. आता 10 कोटीची मागणी केली आहे.
पुढे बोलताना विनायक राऊत यांनी म्हटले की, थ्री बेडरूमचा घर मागितला. ईएमआय मी भरणार नाही. तुम्हीच भरा. या सर्व डिमांड पूर्ण करण्यासाठी त्यांनी आरोप केला आहे. आम्ही आरोपाला भीक घालत नाही. आम्ही अध्यात्मिक आहोत. पंढरपूरचा पांडुरंग आणि बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. कुलदेवतेला गावाला जाणं हा काही गुन्हा नाही.
विनायक राऊत यांचा मुलगा गितेश याच्यावर पत्नी गिरीजा राऊतने गंभीर आरोप केले. हेच नाही तर शारीरिक संबंधासाठी थेट पणे गिरीजा राऊतांनी आरोप केले. काल विनायक राऊत, गितेश राऊत याच्यासह तब्बल 7 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता विनायक राऊत यांनी मोठे गंभीर आरोप गिरीजा राऊत हिच्यावर केले आहेत.