Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू


Jejuri Accident: आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनसाठी राज्यभरातून पालख्या निघाल्या आहेत. आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी (Varkari) चालत पंढरीच्या दिशेने जात असतात. या आषाढी वारीला (Ashadhi Vari) गालबोट लावणारी एक घटना सोमवारी सकाळी घडली आहे. जेजुरीत वारकऱ्यांच्या भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Jejuri Accident news)

प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी परिसरातील भोंगळे मळा वारकऱ्यांच्या अपघात झाला. यावेळी एका ट्रकने वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिल्याचे समजते. यामध्ये सहा वारकरी जखमी झाले आहेत. हे वारकरी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत जात असताना हा प्रकार घडला. यापैकी तीन वारकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ज्ञानोबा माऊलींची पालखी काल जेजुरी मुक्कामी होती. सासवडचा मुक्काम संपल्यानंतर आज पालखी जेजुरीत येणार आहे. आज सकाळी वारकऱ्यांनी जेजुरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. या रस्त्याला एका बाजूने वाहने सोडली जात आहेत. यापैकी एका ट्रकने मागून सहा वारकऱ्यांना धडक दिल्याची माहिती आहे. या वारकऱ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून तिघांची प्रकृती गंभीर होती. यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *