‘डॉक्टरांसमोर कपडे काढावे लागले कारण…’, माजी क्रिकेटपटूच्या मुलाला लिंगपरिवर्तन केल्यानंतर आलेला वेदनादायक अनुभव – Marathi News | Anaya bangar strggle during proving body male to female under Trans Bill Act


माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची लेक अनाया बांगर कायम स्वतःच्या लिंगबदलाच्या प्रवासाबद्दल सांगत असते. आता देखील अनाया हिचा एक नवीन व्हिडीओ समोर येत आहे. ज्यामध्ये अनाया लिंगबदलानंतर कोणत्या अव्हानांचा सामना करावा लागला याबद्दल सांगताना दिसत आहे. धक्कादायक गोष्ट लिंगबदलाची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर अनाया हिला तिच्या जेंडरा पुरावा सादर करावा लागला. सांगायचं झालं तर, अनाया हिने काही महिन्यांपूर्वी थायलँड येथे जाऊन जेंडर-अफर्मिंग म्हणजे वॅजिनोप्लास्टी शस्त्रक्रिया केली. ही वेळ अनाया हिच्यासाठी प्रचंड भावूक करणारी होती, कारण एवढ्या मोठ्या निर्णयात वडिलांनी तिला साथ दिला… मात्र, नुकताच तिला ‘ट्रान्स बिल ॲक्ट’ (Trans Bill Act) अंतर्गत आपल्या स्त्री-ओळखीचा पुरावा सादर करावा लागला; या प्रक्रियेदरम्यान तिला डॉक्टरांच्या एका टीमसमोर कपडे काढावे लागले. अनायाने हा संपूर्ण वेदनादायक अनुभव मुलाखतीत मांडला आहे.

अनाया म्हणाली, ‘‘ट्रान्स बिल ॲक्ट’ झाल्यानंतर, त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मला एका सरकारी रुग्णालयात एका मेडिकल बोर्ड समोर जावं लाहलं. तेथे मला माझे कपडे काढण्यास सांगण्यात आलं… ज्यामुळे डॉक्टर माझ्या संपूर्ण शरीराची तपासणी करु शकतील. त्या खोलीत अनेक डॉक्टर उपस्थित होता. ज्यामध्ये पुरुष डॉक्टर देखील होते.’

‘या तपासणी दरम्यान माझी एक गायनेकोलॉजिकल तपासणी देखील करण्यात आली. तेव्हा मी एकच विचार करत होती आणि तो म्हणजे, मला माझी ओळख सांगण्यासाठी माझ्या शारीराचा पुरावा द्यावा लागत आहे? फक्त यासाठी की, कागदांवर मला माझी ओळख मिळू शकेल, जी मी खरंच आहे… हा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी अत्यंत अस्वस्थ करणारा आणि माझ्या खाजगी आयुष्यात अवांछितपणे ढवळाढवळ करणारा होता. त्या वेळी मला अत्यंत असुरक्षित आणि असहाय्य वाटले.’

अनाया पुढे म्हणाली, ‘मी हे यासाठी सांगत आहे कारण या प्रक्रियेतून जाणं किती कठीण असू शकतं, याची अनेकांना जाणीव नसते. मला आशा आहे की आपण सर्वजण या गोष्टीशी सहमत असू की, एखाद्या व्यक्तीला कायदेशीर ओळख प्रदान करताना तिची प्रतिष्ठा आणि सन्मान पूर्णपणे जपला गेला पाहिजे.’, मात्र, अनाया हिने स्वतःच स्पष्ट केलं की ही संपूर्ण प्रक्रिया तिने स्वतःच्या इच्छेने पार पाडली; कारण तिने तसं केलं नसतं, तर तिला ती ओळख मिळाली नसती जिच्यासाठी ती इतकी कठोर धडपड करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *