RCB Jacob Bethell Ruled Out Of IPL 2026 : गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. युवा फलंदाज जेकब बेथेल (Jacob Bethell) दुखापतीमुळे इंग्लंडला परतला आहे. त्याआधी संघाचा दुसरा स्टार ओपनर फिल सॉल्टही अद्याप पूर्णपणे फिट नसल्याने आरसीबीची चिंता वाढली आहे. मात्र, सॉल्ट क्वालिफायरमध्ये खेळणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आयपीएल 2026 मध्ये आरसीबीने शानदार कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यांना 55 धावांनी पराभव पत्करावा लागला, पण तरीही नेट रनरेटच्या जोरावर त्यांनी टॉप स्थान कायम राखलं. आता 26 मे रोजी धर्मशाळामध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध पहिला क्वालिफायर खेळला जाणार आहे.
🚨 𝙊𝙛𝙛𝙞𝙘𝙞𝙖𝙡 𝘼𝙣𝙣𝙤𝙪𝙣𝙘𝙚𝙢𝙚𝙣𝙩: Jacob Bethell sustained an injury to his left ring finger during our game against PBKS. He will return to England to be assessed ahead of their Test series. ❤️🩹
𝙶𝚎𝚝 𝚠𝚎𝚕𝚕 𝚜𝚘𝚘𝚗, 𝙹𝙱! 🫂 𝚆𝚎’𝚕𝚕 𝚖𝚒𝚜𝚜 𝚑𝚊𝚟𝚒𝚗𝚐 𝚢𝚘𝚞… pic.twitter.com/x6ipurfteA
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 23, 2026
जेकब बेथेल अचानक लंडनला रवाना (Jacob Bethell Ruled OUT IPL 2026)
दरम्यान, जेकब बेथेलच्या दुखापतीने संघाला मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता. आता तो इंग्लंडला परतला आहे. इंग्लंड-न्यूझीलंड टेस्ट मालिकेपूर्वी त्याच्या दुखापतीचं परीक्षण केलं जाणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. आरसीबीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
फिल सॉल्ट दुखापतग्रस्त झाल्यानंतर बेथेलला ओपनिंगची संधी मिळाली होती. मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला असला, तरी त्याच्या प्रतिभेची क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताविरुद्ध त्याने शानदार शतक झळकावत एकहाती सामना खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याची अनुपस्थिती आरसीबीसाठी मोठं नुकसान मानलं जात आहे.
Official Statement – Jacob Bethell
The England and Wales Cricket Board has agreed with Royal Challengers Bangalore that top-order batter Jacob Bethell will return to the UK after sustaining a left ring finger injury while playing in the Indian Premier League.
He will be fully… pic.twitter.com/ruEFdDPIqf
— England Cricket (@englandcricket) May 23, 2026
आरसीबी पहिला क्वालिफायर खेळणार (RCB vs GT Qualifier 1 IPL 2026)
आरसीबीने यंदाच्या हंगामात 14 पैकी 9 सामने जिंकले आणि 18 गुणांसह अव्वल स्थान मिळवलं. गुजरात टायटन्सचेही 18 गुण आहेत, पण आरसीबीचा नेट रनरेट अधिक चांगला आहे. आता या दोन संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमधील विजेत्या संघाला थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे, तर पराभूत संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आणखी एक संधी मिळेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा