Weekly Horoscope 25 To 31 May 2026: उद्यापासून 25 To 31 मे 2026 हा आठवडा सुरू आहे, हा आठवडा अनेकांसाठी नशीब पालटणारा तसेच प्रगती करणारा ठरणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात ग्रहस्थिती बदलती असल्यामुळे अनेक राशींना नवीन अनुभव आणि संधी मिळू शकतात. या काळात सूर्य, बुध, मंगळ, शुक्र आणि राहू नक्षत्र बदलत आहेत. तर बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. 25 मे रोजी सूर्याचे रोहिणी नक्षत्रात संक्रमण होतंय, ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे मे महिन्याचा चा नवा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी या आठवड्यात करिअरमध्ये प्रगतीची चांगली शक्यता आहे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुलतील. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ जाईल. प्रेम जीवनात सकारात्मक बदल दिसतील. आरोग्याकडे मात्र थोडे लक्ष द्यावे लागेल..
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. व्यवसायात नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल. जोडीदारासोबत संवाद वाढल्याने नात्यात गोडवा येईल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येणार आहे. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रवासाचे योग संभवतात. प्रेमसंबंधात आनंद आणि उत्साह राहील.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीसाठी हा आठवडा भावनिक निर्णय टाळा आणि व्यवहारिक विचार करा. करिअरमध्ये काही अडथळे येऊ शकतात, पण संयम ठेवल्यास यश मिळेल. कौटुंबिक वातावरण शांत राहील. आरोग्यात थोडा थकवा जाणवू शकतो.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रेम जीवनात जवळीक वाढेल. आरोग्य चांगले राहील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. व्यवसायात नवीन कल्पना यशस्वी होतील. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आरोग्यासाठी विश्रांती घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारांमध्ये यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेम जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी हा आठवडा भाग्याची चांगली साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संयम आणि शांतता राखणे आवश्यक आहे. कामात काही अडथळे येऊ शकतात, पण प्रयत्न सुरू ठेवा. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. खर्च वाढू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन योजना आणि कल्पना यशस्वी होतील. व्यवसायात फायदा मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. प्रेम जीवनात गोडवा वाढेल. खर्च नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मेहनतीचे योग्य फळ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रेम जीवन आनंदी राहील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल.
हेही वाचा
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस…5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल..भरभराट दुप्पट..! पॉवरफुल भद्र राजयोग, मे च्या शेवटी कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
आणखी वाचा