हनिमूनला गेलो शारीरिक संबंधास… विनायक राऊत यांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, इंटरनॅशनल जाऊनच – Marathi News | Daughter in law of former MP and Shiv Sena leader Vinayak Raut has filed police complaint leveling shocking allegations against her husband and his family


शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत मोठ्या गोत्यात आले. विनायक राऊत यांच्या सूनेने अत्यंत गंभीर आरोप करत अख्ख्या कुटुंबियांविरोधात पोलिस तक्रार दिली. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पती आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवक गितेश राऊत, सासरे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह एकून 7 जणांवर गुन्हा दाखल केला. काैटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच हादरवणारे आरोपही तक्रारीत करण्यात आलीत. जादूटोणा करत असल्याचेही तिने तक्रारत म्हटले. तिचे केस कापले, गोमूत्र पाजले, हेच नाही तर पती देखील मानसिक त्रास देत असल्याचे तिने म्हटले.

गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटले की, लग्न झाल्यानंतर आम्ही ऊटी येथे हनीमूनला गेलो. ऊटीत आम्ही 6 दिवस होतो. पण गितेशने माझ्यासोबत शीरीरिक संबंध ठेवले नाही. तो सारखा माझ्यापासून दूर पळत होता. तो माझ्यासोबत नक्की असे का वागत आहे, यावर मी त्याला विचारले असता, तुला काही प्रॉब्लेम आहे का? यावर त्याने मला म्हटले की, मेंटल कनेक्ट होणे खूप जास्त गरजेचे असते.

शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नसतात. हेच नाही तर त्याने हनिमूनचा कंटाळा येतो, असेही म्हटले. तो माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे टाळत. 2018 मध्ये आम्ही फिरायला ऑस्ट्रेलियात गेलो. त्यावेळी आमच्यासोबत गितेशचा मित्र महेक नंदू आणि त्याची पत्नी प्रियंका देखील होते. यादरम्यान गितेश माझ्याजवळही आला नाही, मी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असताना त्याने शिवीगाळ करून मला मारहाण केली.

शारीरिक संबंधांवरून त्यावेळी आमच्यात वाद झाले.त्याने मला थेट म्हटले की, तू जर मला हात लावला तर तू विधवा होशील. आमच्या झालेल्या वादानंतर त्याने मला काहीच खायला दिले नाही आणि उपाशी ठेवले. हेच नाही शारीरिक संबंधावर त्याचे स्पष्ट मत होते की, मी विदेशात सेक्स करू शकतो, इथे नाही. इथे जसे पाहिजे तसे वातावरण मिळत नाही. आता विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *