Numerology 24 May 2026: मूलांक 4 विचारांचा अतिरेक टाळा! जाणून घ्या, मूलांक शास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य


Numerology Prediction, 24 May 2026: मूलांक 1, 3 सह या मूलांकासाठी मेहनत, नियोजन महत्त्वाचे आहे. मूलांक 2, 5 सह या जातकांसाठी बदल सकारात्मक, मूलांक 7, 9 सह या मूलांकासाठी कामात नशिबाची साथ असेल. या मूलांकांचा खर्च वाढेल तर या मूलांकासाठी प्रवास लाभदायक आहे. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 01 ते 09 साठी रविवार कसा आहे?

Numerology 24 May 2026
Ank bhavishya,24 May 2026: मूलांक 1 साठी मेहनत आहे पण त्याचे फळ मिळणार, मूलांक 3 असणाऱ्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. मूलांक 6 असणाऱ्यांनी अती विचार कमी करावा. मूलांक 9 साठी कामात जोश आणि उत्साहामुळे कामे वेगाने पूर्ण होतील. चला तर पाहूया मूलांक 01 ते 09 या मूलांकांसाठी रविवार कसा असेल?

मूलांक 1 – मेहनत केली तरच यश

मूलांक 1 - मेहनत केली तरच यश

मूलांक 1 साठी रविवारी थोडी मेहनत आहे. मेहनत केली तरच फळ मिळते लक्षात ठेवा.जी काही योजना आखणार आहात मग ती करिअरसाठी किंवा घरासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. नेहमीचे काम करताना कंटाळा येवू शकतो. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी टीमसोबत फोकस वाढवा तर यश मिळेल. घरात वातावरण सुखासमाधानाचे असेल.

मूलांक 2 – क्रिएटीव्ह कामात फोकस वाढवा

मूलांक 2 - क्रिएटीव्ह कामात फोकस वाढवा

मूलांक 2 असणाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी थोडी समस्या असेल, तुम्ही सल्ला घेवून काम करा. क्रिएटीव्हीटीकडे जास्त फोकस केला तर यश मिळेल. काही नवीन योजना डोक्यात येतील त्या लिहून काढा. काही कोर्स किंवा शिकण्याचा विचार करत असाल तर नक्की पुढे व्हा. घरात वातावऱण ठिक असेल पण तुम्हीसुद्धा सगळ्यांसोबत आपुलकिने बोला.

मूलांक 3 – नियोजन, व्यवस्थापन यशाची सुत्रे

मूलांक 3 - नियोजन, व्यवस्थापन यशाची सुत्रे

मूलांक 3 साठी खर्चात वाढ आहे. खर्च का वाढतो ते आधी तपासा. नोकरी असो वा व्यवसाय नियोजन, व्यवस्थापन यावर भर द्या. काम करताना सावध राहा कारण तुमच्या कामाचे श्रेय इतर लोकं घेवू शकतात. खर्च, ताणतणाव यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. घरातील मंडळी तुम्हाला सपोर्ट करतील त्यामुळे थोडे रिलॅक्स व्हाल.

मूलांक 4 – संवादाने समस्या कमी करा

मूलांक 4 - संवादाने समस्या कमी करा

मूलांक 4 असणारे रविवारी शिस्त, स्पष्ट बोलण आणि स्थिरता यावर जास्त भर देतील. घरातील वातावरण ठिक दिसत असेल तरी थोडी धुसफुस किंवा नाराजी आहे, त्यावर उपाय म्हणजे संवाद साधणे आणि नातेसंबंध जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येक काम उत्तमप्रकारे पूर्ण होईल, फक्त नियोजन वेळेत करा. जे काम थांबलेले होते ते अचानक सुरु होण्याची शक्यता आहे.

मूलांक 5 – घाई गडबड टाळावी

मूलांक 5 - घाई गडबड टाळावी

मूलांक 5 साठी रविवार गतीमान आहे. कामात फोकस टिकवून ठेवल्याने यश मिळेल. घाई करणे टाळा आणि सखोल विचाराने निर्णय घ्या. नोकरी, व्यवसाय. किंवा घरी बदलाचे योग असून बदल सकारात्मक असेल. जनसंपर्क वाढणार असून त्याचा फायदा भविष्यात होईल. प्रवासाचा योग असून ज्या कामासाठी प्रवास करताय ते काम होईल.

मूलांक 6 – अती विचार करणे घातक

मूलांक 6 - अती विचार करणे घातक

मूलांक 6 असणाऱ्यांच्या जास्त वेळ घरात जाणार आहे. जोडीदारासोबत भांडू नका प्रेमाने वागा. त्यांना समजून घ्या म्हणजे त्यांच्या साथीने काम पटापट पूर्ण होईल. सुसंवादाने आणि आपुलकीने वागा म्हणजे संकटकाळात तातडीने मदत मिळेल. नोकरी असो वा व्यवसाय याबाबत फार विचार केला तर ताण वाढू शकतो. तुमचे काम वेळेत पूर्ण करा.

मूलांक 7 – प्रवासात लाभ, नशिबाची साथ

मूलांक 7 - प्रवासात लाभ, नशिबाची साथ

मूलांक 7 असणारे रविवारी जास्त खर्च करणार आहेत. जोरदार खरेदीमुळे घरातील मंडळी खुष असतील.आर्थिक निर्णय घेताना घाईगडबड टाळा.प्रवासाचा योग असून त्यात लाभ असेल. कामात नशिबाची साथ आहे त्यामुळे त्यामुळे प्रोजेक्ट वेळे पूर्ण होईल. घरातील वातावरण सुखासमाधानाचे असेल.त्यामुळे तुम्ही थोडे रिलॅक्स फिल कराल.

मूलांक 8 – व्यवसायात सल्ला महत्त्वाचा

मूलांक 8 - व्यवसायात सल्ला महत्त्वाचा

मूलांक 8 साठी रविवार चांगला असून एखादे पेमेंट थांबले असेल तर ते मिळण्याचे योग आहेत. नियोजन आणि व्यवस्थापनावर भर दिली तर काम पटापट पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना काही नवीन शिकायचे असेल तर नक्की प्रयत्न करा. व्यवसायात काही नवीन तंत्रज्ञान घेवून येण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

मूलांक 9 – उत्साह, जोश वाढेल

मूलांक 9 - उत्साह, जोश वाढेल

मूलांक 9 साठी रविवारी उत्साह वाढेल. कामात जोश असेल. तुम्ही घरची तसेच ऑफिसमधील कामे व्यवस्थित पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी मदत मिळेल, सहकाऱ्यांची साथ असल्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल. अती घाई संकटात नेई, लक्षात ठेवा. घरात तुम्हाला मोकळे वातावरण असेल त्यामुळे तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ तयार करा. जोरजोरात हसा आणि तुमच्या जीवनाचा आस्वाद घ्या.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा