टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील कर्णधार शुबमन गिल नेहमीच चर्चेत असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल हे रिलेशनमध्ये असल्याचे बोलले जाते. हे दोघे अनेकवेळे एकत्र स्पॉ झाले आहेत. दरम्यान, यावेळी मात्र शुबमन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
शुबमन गिल आणि तेंडुलकर कुटुंबाचे काही फोटो समोर आले आहेत. शुबमन गिल या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर, सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांच्यासोबत बसलेला दिसत आहे.
विंबलडन टेनिस क्रिकेट स्पर्धेत हे चौघे प्रेक्षक म्हणून रॉयल बॉक्समध्ये बसलेले आढळले. याच स्पर्धेमध्ये शुबमन याच्यासोबत विंबलडन येथे त्याचे काही मित्रही होते. याच मित्रांमध्ये शुबमन गिलसोबत एक तरुणी झळकली.
ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे, याबाबत विचारले जात आहे. शुबमन गिलसोबत उभी असलेली ही मिस्ट्री गर्लचे नाव तनवी शाह असे आहे. तनवी शाह ही एक प्रोफेशनल टेनिस खेळाडू आहे.
सध्या मात्र ती टेनिस खेळत नाही. परंतु तिने अनेक क्रिकेट आणि टेनिस स्पर्धांचे सूत्रसंचालन केलेले आहे. अनेक टी-20 सामन्यांमध्ये तसेच आयपीएलमध्येही ती सामन्यांमध्ये समालोचन तसेच सूत्रसंचालन करताना दिसलेली आहे.




