ममता बॅनर्जी एकट्या पडल्या; विश्वासू नेता फुटीर गटाला साथ देणार? पक्षाचं चिन्हही जाणार? – Marathi News | Mamata banerjee Party leaer anubrata mondal May join ritabrata rebel camp latest marathi news


पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे एक-एक साथीदार साथ सोडत आहेत. आता ममता बॅनर्जी यांचा विश्वासू नेता देखील फुटीर गटात जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षातील विश्वासू नेता फुटीर गटात जाणार असल्याच्या चर्चेने ममता बॅनर्जी एकट्या पडल्याची चर्चा आहे. ममता बॅनर्जी यांचे विश्वासू नेते अनुब्रत मंडल हे फुटीर गटात सामील होऊ शकतात, असा दावा फुटीर गटातील एका नेत्याने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या फुटीर गटाच्या राष्ट्रीय कार्य समितीची दोन दिवसीय बैठक एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित केली जाणार आहे. या बैठकीआधी माध्यमांशी संवाद साधताना रितब्रत बॅनर्जी यांनी मोठा दावा केला. त्यांनी म्हटलं की, ‘4 मे रोजी अनुब्रत मंडल यांच्यासोबत कमीत कमी 30 वेळा बोलणं झालं आहे’. पंरुत रितब्रत यांनी अधिक बोलणे टाळले.

एका फुटीर आमदाराने म्हटलं की, ‘फक्त एक दिवस थांबा. सर्व गोष्टी स्पष्ट होतील’. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचे विश्वासू नेते अनुब्रत यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. ममता बॅनर्जी यांचा विश्वासू नेता अनुब्रत मंडल यांनी खरंतर 4 मेपासून मौन बाळगलं आहे. त्यांनी अद्याप पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींवर उघडपणे भाष्य केलेलं नाही. तसेच मागील काही दिवसांत आमदार, माजी मंत्री चंद्रनाथ सिन्हा, काजल शेख सारख्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली. कथित गो तस्करी प्रकरणात अनुब्रत मंडल यांनी 25 महिने तुरुंगात काढले. त्यानंतर ते सप्टेंबर 2024 नंतर जामिनावर सुटले.

पक्षाचं चिन्ह जाणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुब्रत मंडल यांना शनिवारी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ते रितब्रत गटात सामील होऊ शकतात. फुटीर गटात सामील झाल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तत्पूर्वी, फुटीर गट आता पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर देखील दावा ठोकू शकतात. फुटीर गटाने निवडणूक आयोगाला पाठवण्यासाठी मसुदा देखील तयार केला असल्याचे बोलले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *