Jos Buttler-Rohit Sharma : भारत आणि इंग्लंडमध्ये पाचवा टी20 सामना साउथॅम्टनमध्ये आहे. हा सामना टीम इंडियासाठी प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण आणखी एक सामना गमावला तर फक्त क्लीन स्वीपच होणार नाही, तर टी20 मधील वर्चस्व सुद्धा संपुष्टात येईल. इंग्लंडची टीम भारताला मागे टाकून T10I मध्ये नंबर 1 बनेल. साउथॅम्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या सीरीजच्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्माचा एक रेकॉर्ड मोडला जाणार हे निश्चित आहे.
हे रेकॉर्ड सर्वाधिक T20 सामन्यांशी संबंधित आहे. जगात सर्वाधिक T20 सामने खेळण्याचा रेकॉर्ड आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावावर आहे. तो 163 सामने खेळला आहे. आयर्लंडचाच जॉर्ज डॉकरेल आणि भारताचा रोहित शर्मा प्रत्येकी 159 T20 सामने खेळून संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत.
दुसऱ्या स्थानावर येण्याची बटलरकडे संधी
इंग्लंडचा जोस बटलरही आतापर्यंत 159 टी20 सामने खेळला आहे. साउथॅम्टनमध्ये रोहित आणि डॉकरेलाचा 159 सामन्यांचा रेकॉर्ड मोडून दुसऱ्या स्थानावर येण्याची बटलरकडे संधी आहे. जगात सर्वाधिक टी20 इंटरनॅशनल सामने खेळणाऱ्या टॉप पाच खेळाडूंमध्ये रोहित शर्मानंतर जॉस बटलर येतो. रोहितने आपल्या T20 इंटरनॅशनल करिअरमध्ये 159 सामन्यात 4231 धावा केल्या आहेत. आतापर्यंत खेळलेल्या 159 टी20 इंटरनॅशनल सामन्यात जॉस बटलरने 4081 धावा केल्या आहेत.
बटलरच्या करिअरमधील 160 वा t20 सामना
भारताविरुद्ध 5 वा t20 सामना हा जॉस बटलरच्या करिअरमधील 160 वा t20 सामना असेल. साउथॅम्प्टनच्या मैदानावर उतरताच तो नवीन विक्रम रचेल. 5 व्या T20 सामन्यात तो रोहित शर्माच्या पुढे जाईल. आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग नंतर दुसरा सर्वाधिक t20 सामने खेळणारा खेळाडू बनले.
जगातील सहावा खेळाडू बनण्याची संधी
आतापर्यंत जे पाच खेळाडू 150 पेक्षा जास्त सामने खेळलेत, त्यात पॉल स्टर्लिंग, रोहित शर्मा, जॉर्ज डॉकरेल, जॉस बटलर आणि मोहम्मद नबी यांचा समावेश होतो. साउथॅम्प्टनमध्ये 160 वा t20 इंटरनॅशनल सामना खेळणारा बटलर दुसरा खेळाडू असेल. साउथॅम्प्टनमध्येच इंग्लंडचा स्पिनर आदिल रशीदकडे 150 वा T20I खेळणारा जगातील सहावा खेळाडू बनण्याची संधी असेल. त्याने 149 टी20 सामने खेळले आहेत.