ओल्ड मॉन्क ही रम आउट ऑफ स्टॉक होण्यामागचं नेमकं कारण काय? (Why Old Monk out of stock)
सध्या पावसाचे दिवस आहे आणि या दिवसांमध्ये रमची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र अलीकडे ओल्ड मॉन्क ही रम आउट ऑफ स्टॉक झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात अनेक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसह नेटकऱ्यांनी यावर व्हिडीओ शेयर केले आहे. यामध्ये आता मराठी अभिनेते विद्याधर जोशींनी सुद्धा पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या असून अनेक चर्चाही यावरून घडत आहे. मात्र, ओल्ड मॉन्क ही रम आउट ऑफ स्टॉक होण्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत संभाव्य कारण आपण जाणून घेऊ.
तर ओल्ड मॉन्क हि जगभरात बहुतांश देशात विक्री होणारी रम आहे. भारत तिचे मुख्य उत्पादन उत्तर भारतात म्हणजेच उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि लखनौला होतं. तेथून ती संपूर्ण देशात डिस्ट्रीब्यूटर्सच्या माध्यमातून पाठवली जाते. या पुरवठा साखळीत थोडा जरी खंड पडला, तरी स्थानिक बाजारातील स्टॉक लगेच संपतो. अशातच हिवाळा आणि पावसाळी ऋतूमध्ये रमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यात ओल्ड मॉन्क ही अत्यंत माफक दरात मिळणारी दर्जेदार रम असल्याने दुकानात माल येताच ग्राहक तो काही दिवसांतच पूर्ण संपवून टाकतात. दरम्यान, भारतात दारूचे नियमन प्रत्येक राज्याचा राज्य उत्पादन शुल्क (State Excise) विभाग करत असतो. परवाने मिळण्यात होणारा उशीर किंवा एक्साईज ड्युटी वाढीमुळे अनेकदा नवीन स्टॉक दुकानांपर्यंत पोहोचण्यास कित्येक आठवडे लागतात. परिणामी, कंपनी आणि स्थानिक डिस्ट्रीब्यूटर्सकडून पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ओल्ड मॉन्कचा स्टॉक पुन्हा तुमच्या जवळच्या वाईन शॉप आणि बारमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
अभिनेते विद्याधर जोशी पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?
(मला मान्य आहे की सध्या खूप गंभीर प्रश्न आजूबाजूला आहेत. पण, काही प्रश्न पडतात त्याला काही करता येत नाही.) गेले काही दिवस बाजारामध्ये Old Monk चा स्टॉकच नाहीये. बार मध्ये सुद्धा मिळत नाहीये. क्लबमध्ये सुद्धा Old Monk मिळत नाहीये!! काय प्रॉब्लेम काय झालाय? त्यात हा पाऊस असा!
विद्याधर जोशींच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. यावर कोणी ‘समदुःखी’ म्हणालेय तर कोणी ” हा खूप मोठा प्रश्न आहे”, “बाप्पा आमच्याकडे या”, “ब्लिंकइट करा”, “आपलं दुःख सारखंच आहे….” अशा असंख्य कमेंट्स जोशी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर आल्या आहेत.