Gold Price Today: सोन्याने पुन्हा उडवली झोप, वीकेंड जवळ येतानाच सराफा बाजारात मोठी घडामोड; 10 ग्रॅम सोनं.. – Marathi News | Gold silver price today 10 July 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune Chennai India


देशातील प्रमुख शहरांत 10 जुलैला सोन्याचे भाव किती ?

जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाल्याचा परिणाम आता देशांतर्गत बाजारातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. 10 जुलै रोजी सकाळी देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. मात्र, दुसरीकडे चांदीच्या किमतीत घसरणीचा कल कायम आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1,44,600 रुपये इतका झाला असून, 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,32,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,104.75 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, याआधीच्या दिवशी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात 350 रुपयांची घसरण झाली होती.

प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर घ्या जाणून

दिल्ली

24 कॅरेट: 1,44,600 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,32,560 रुपये प्रति 10 ग्रॅम

मुंबई आणि कोलकाता

24 कॅरेट: 1,44,450 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,32, 410 रुपये प्रति 10 ग्रॅम

चेन्नई

24 कॅरेट: 1,45,320 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,33,210 रुपये प्रति 10 ग्रॅम

पुणे आणि बेंगळुरू

24 कॅरेट: 1,44,450 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,32,410न रुपये प्रति 10 ग्रॅम

10 शहरातील सोन्याचे 22कॅरेट आणि 24कॅरेट सोन्याचे दर खालीलप्रमाणे

चांदीचे दर

चांदीच्या किमतीत मात्र घसरण सुरूच असून, 10जुलै रोजी सकाळी चांदीचा दर 2,34,900  रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर 58.96 डॉलर प्रति औंस आहे.

सोने आणि चांदीच्या किमती केवळ देशांतर्गत मागणी-पुरवठ्यावर अवलंबून नसून, जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरचा विनिमय दर, व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली यांचाही त्यावर मोठा प्रभाव पडतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *