Shani Sade Sati: शनिदेव.. या नावाचा उल्लेख जरी झाला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. आणि त्याहूनही अधिक भीती वाटते ती म्हणजे शनि साडेसातीची…काही लोकांना असे वाटते की शनिचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनात केवळ संकटेच आणतो. मात्र, प्रत्येकाने शनिच्या साडेसातीला घाबरण्याची गरज नाही. कारण या जगात असे काही लोक असतात, जे शनि साडेसातीच्या प्रभावाखाली असूनही त्यांना शुभ फळे मिळतात. या लोकांवर शनि साडेसातीचा कठीण काळ सुरू असूनही पैसा, यश, प्रतिष्ठा मिळते. या लोकांना शनिदेव कधीही हानी पोहचवत नाही, कोण आहेत ते लोक, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय….
शनि साडेसातीच्या काळातही ‘या’ लोकांना पैसा, यश, प्रतिष्ठा मिळते..(Shani Sade Sati)
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा कर्माचा न्यायाधीश आणि दाता आहे, जो त्यानुसार शुभ किंवा अशुभ फळे देतो. शनि अनावश्यक दुःख देत नाही, उलट व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा जेव्हा शनीचे संक्रमण होते, तेव्हा साडेसाती काही विशिष्ट राशींमध्ये सुरू होते, परंतु साडेसातीचे परिणाम प्रत्येकासाठी सारखे नसतात. साडेसाती अनेक लोकांना आर्थिक लाभ, प्रगती आणि आदर मिळवून देते.
शनिदेवाकडून कधीही हानी पोहोचत नाही…
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळे देतात. जे नेहमी प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि निष्ठेने काम करतात, त्यांना शनिदेवाकडून कधीही हानी पोहोचत नाही. शनिदेव त्यांच्या कष्टाचे योग्य फळ देतात. एखादी व्यक्ती साडेसातीच्या किंवा शनिच्या अशुभ प्रभावाखाली असली तरीही, शनि शुभ फळे देतो. जे लोक जीवनात चांगली कर्मे करतात, त्यांना साडेसातीच्या काळातही मोठे यश आणि आर्थिक लाभ मिळतो.
‘अशा’ लोकांना शनिदेवाची विशेष कृपा लाभते…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जे प्रामाणिक आणि मेहनती, तसेच शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ असतात, त्यांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. साडेसातीच्या प्रभावाखाली असतानाही, अशा व्यक्तींना नवीन करिअरच्या संधी मिळतात. अशा व्यक्तींना नोकरीत बढती, व्यवसायात विस्तार आणि वाढता मान-सन्मान मिळतो. शनिदेव अशा व्यक्तींच्या मार्गात कधीही कोणतीही अडचण येऊ देत नाहीत.
साडेसातीची भीती बाळगू नका…
ज्योतिषींच्या मते, शनीच्या साडेसातीने प्रभावित झालेल्यांनी आपल्या कर्मांना घाबरण्याऐवजी त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. जे प्रामाणिकपणा, समर्पण आणि कठोर परिश्रमाने काम करतात आणि वाईट कृत्ये टाळतात, त्यांना शनीच्या साडेसातीचे सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतील. याउलट, जे फसवणूक, कपट, आळस आणि अप्रामाणिकपणात गुंतलेले असतात, त्यांना शनीचा नेहमीच त्रास होतो. असे अनेकदा दिसून येते की, जे योग्य मार्गाचे अनुसरण करतात आणि सत्कर्म करतात, त्यांना साडेसातीच्या काळातही मोठे यश मिळते.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)