लातूरच्या उदगीरमध्ये धक्कादायक घटना, युवकानं उचलंलं टोकाचं जीवन, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद


Latur News : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. माळेवाडी येथे अंबादास माधवराव घंटे या युवकाने धारदार हत्याराने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात पाठवला.

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

अंबादासने इतके टोकाचे पाऊल का उचलले, या मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक, आर्थिक किंवा इतर कोणते कारण होते का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तसेच “अंबादास याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. मागील काही वर्षापासून त्याच्यावर मानसोपचार तज्ञ यांच्याकडे उपचार सुरू आहेत. मानसिक ताणतणावातून त्याने स्वतःचा गळा धारदार शास्त्रने चिरून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास करत असल्याची माहिती उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी दिलीप गाडे यांनी दिली आहे. या घटनेमुळे माळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून उदगीर ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

दोन इसमावर अज्ञाता कडून कोयत्याने हल्ला  दोन्ही हल्लेखोर फरार

वाशिम जिल्ह्यात देखील धक्कादायक घटना घडली आहे. मंगरुळपीर शहरात बसस्थानक परिसरात दोन व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, नेमकं वादाचं कारण अस्पष्ट आहे. हल्लेखोर फरार झाले असून मंगरुळपीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

पोलीस कर्मचाऱ्यावरच कायदा मोडल्याचा गंभीर आरोप

कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरच कायदा मोडल्याचा गंभीर आरोप झाला आहे. नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या प्रशांत गजभारे या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्या पत्नीशी विवाह कायम असतानाच दुसरा विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विवाहाची माहिती मिळताच पहिली पत्नी थेट विवाहस्थळी पोहोचली. दुसरे लग्न का केले याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या पत्नीला समजावण्या ऐवजी नवरदेवाच्या वेशात असलेल्या पतीनेच तिच्यावर अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *