Video: नीट बोला.. नीट बोला… आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा


मुंबई : विधिंमडळ अधिवेशनात विधानसभेत भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी सभागृहात मंत्री उपस्थित नसतात, यावरुन प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. तर, भास्कर जाधव यांच्या आक्षेपावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर देताना भास्कर जाधवांना टोला लगावला. सभागृहात दोन दोन कॅबिनेट मंत्री उपस्थित आहेत, ज्या विषयावर चर्चा आहे, त्या विभागाचे राज्यमंत्री उपस्थित आहेत. पण, ज्यांना विरोधीपक्ष नेते व्हायची आस लागली आहे, त्यांना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री कोण आहेत? हेच माहिती नाही, असे म्हणत अतुल भातखळकर (BJP) यांनी भास्कर जाधवांना लक्ष्य केलं. त्यावेळी, आदित्य ठाकरेंचा (Aaditya Thackeray) पार चांगलाच चढल्याचं दिसून आलं.  

राज्यातील पाऊस आणि नुकसानीसंदर्भातील विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण मंत्री उपस्थित नसल्याचे सांगत भास्कर जाधव विधानसभेत संतापले, हे सरकार बेजबदार आहे, नुसती चर्चा करुन विषय संपवून टाकू, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव आणि विरोधकांना टोला लगावला. सरकार बेताल आहे, उद्दाम आहे अशी संसदीय भाषा वापरली जात असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटलं. त्यानंतर, आदित्य ठाकरेंनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. 

तुम्ही सांगू नका, राम मंदिर लुटणारे तुम्ही, राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, नीट बोला… नीट बोला… तुमंच वय बघून बोला, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी आपली आक्रमक भूमिका दाखवली. तेव्हा, तुम्ही खाली बसा ओ असे भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हटले. त्यामुळे, सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. 

आदित्य ठाकरेंनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी एसआयआरच्या मुद्द्यावर आज निवडमूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. मी मुख्यत: तीन विषयावर आज निवडणूक आयुक्ताची भेट घेतली. राज्यात SIR सुरु झाल्यापासून पाऊस सुरु झाला आहे, त्यामुळे पुढे दहा दिवस कालावधी वाढवण्याची विनंती केली आहे. त्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासोबत बोलणं करण्याची विनंती केली आहे. म्हाडा आणि SRA च्या सोसायटी पुनर्वसन संदर्भात समस्या आहेत, त्यावर तोडगा काढावा अशी देखील मी मागणी केल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. SIR साठी स्टाफ कमी पडतोय अशा अनेक तक्रारी आहेत, अनेक कर्मचाऱ्यांना शाळा, हॉस्पिटल आणि अधिवेशनची काम आहेत. त्यामुळे, देखील कामावर परिणाम होतोय त्यामुळे पुढे 10 दिवस प्रक्रिया वाढवा अशी मागणी केल्याचं आदित्य यांनी भेटीबाबत सांगितलं. 

हेही वाचा

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *