IND vs ENG : जोफ्रा समोर एक्सपोज झाला, 10 बॉलमध्येच वैभव सूर्यवंशीचा खेळखल्लास, नेमकं काय घडलं? | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

जोफ्रा आर्चरने वैभव सूर्यवंशीला एक्सपोज गेला.जोफ्राने वैभव सूर्यवंशीचा अवघ्या 10 बॉलमध्ये खेळखल्लास केला.

jofra archer takes Vaibhav sooryavanshi
jofra archer takes Vaibhav sooryavanshi

Jofra Archer takes Vaibhav Sooryavanshi Wicket : ब्रिस्टलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी20 सामन्याला सूरूवात झाली आहे. या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्यात बॅटल सूरू असल्याचे बोलले जात होते.यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या. पण आज जोफ्रा आर्चरने वैभव सूर्यवंशीला एक्सपोज गेला.जोफ्राने वैभव सूर्यवंशीचा अवघ्या 10 बॉलमध्ये खेळखल्लास केला.

खरं तर वैभव सूर्यवंशीला संजू सॅमसनच्या जागी तिसऱ्या सामन्यात खेळायची संधी दिली.या संधीच सोनं करत वैभव सूर्यवंशीने मोठी खेळी करणे अपेक्षित होते. मात्र आज देखील वैभव सूर्यवंशी फ्लॉप ठरला. कारण जोफ्रा आर्चरने सलग दुसऱ्या सामन्यात त्याला बाद केल.

जोफ्रा आर्चरचा बॉल आखूड लांबीचा आणि ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर होता, वैभवने त्यावर फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण बॉल बॅटच्या वरच्या भागाला लागून वर गेला. मिड-ऑनला उभ्या असलेल्या करनने उत्कृष्ट कॅच घेतली.यावेळी वैभव सूर्यवंशी 10 बॉलमध्ये 15 धावा करून बाद झाला.या खेळीत त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला होता.

दरम्यान जोफ्रा आर्चरने वैभव सूर्यवंशीला दुसऱ्यांदा आऊट करून त्याला इंटरनेशनल मॅचमध्ये पूर्णपणे एक्सपोज केला आहे. आता यावर वैभव काय तोडगा काढतो? कि जोफ्राचा शिकार होत बसतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याआधी वैभवने मागच्या दोन सामन्यात 14 आणि 13 धावा केल्या होत्या आणि आज 15 धावा.त्यामुळे वैभवचा आंतरराष्ट्रीय डेब्यू हवा तसा होऊ शकला नाही आहे.

वैभव पाठोपाठ ईशान किशनही 4 धावांवर बाद झाला आहे.त्यानंतर अभिषेक शर्मा देखील 16 वर बाद झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था 50 वर 3 विकेट अशी झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *