APMC Market : आल्याचे दर तेजीत, ज्वारीही खातीये भाव, कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा | शेती बातम्या


Last Updated:

कृषी बाजार समित्यांमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या चार पिकांची आजची उलाढाल पाहणार आहोत. यामध्ये ज्वारी, कांदा, आंबा आणि आले या पिकांची बाजारातील स्थिती जाणून घेऊ.

+

News18

News18

सांगली: राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या चार पिकांची आजची उलाढाल पाहणार आहोत. यामध्ये ज्वारी, कांदा, आंबा आणि आले या पिकांची बाजारातील स्थिती जाणून घेऊ. बाजारात गुणवत्ता आणि वाणानुसार ज्वारीलादरामध्ये चढ-उतार दिसतो आहे.

राज्यभरात आज एकूण 2383 क्विंटल ज्वारीची एकूण आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये 747 क्विंटल मालदांडी ज्वारीची आवक झाली. त्यास 6000 ते 6400 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 267 क्विंटल ज्वारीस 5500 रुपये सर्वाधिक सरासरी भाव मिळाला.

राज्यभरात आज 2 लाख 23 हजार 821 क्विंटल कांद्याची आवक झाली. नाशिक बाजारात सर्वाधिक 144689 क्विंटल उन्हाळी कांदा दाखल झाला. नाशिक मार्केटमध्ये कांद्याला 875 ते 2688 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच सातारा बाजारात आवक झालेल्या 198 क्विंटल कांद्यास 3000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सर्वाधिक दर मिळाला.

राज्यभरात आज 8053 क्विंटल आंब्याची आवक झाली. मुंबई बाजारात सर्वाधिक 4693 क्विंटल आंबा दाखल झाला. तेथे आंब्याला 6000 ते 16000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सर्वाधिक दर मिळाला. तसेच नागपूर बाजारात आवक झालेल्या 231 क्विंटल तोतापूरी आंब्यास सरासरी 1725 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सर्वात कमी भाव मिळाला.

बाजारात एकूण 2547 क्विंटल आल्याच्या आवकेची नोंद झाली. यापैकी मुंबई बाजारात सर्वाधिक 1437 क्विंटल आले दाखल झाले. त्यास प्रतीनुसार 10000 ते 16000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर बाजारात आवक झालेल्या 11 क्विंटल आल्यास मिळालेला 17500 रुपये आजचा सर्वाधिक आल्याचा बाजारभाव ठरला.

मराठी बातम्या/कृषी/

APMC Market : आल्याचे दर तेजीत, ज्वारीही खातीये भाव, कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *