Last Updated:
इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम रद्द करण्याची घोषणा केली आहे.
इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याामुळे आता इस्त्रायलनेही इराणवर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. इस्रायलच्या सैनाने एकीकडे हल्ल्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज रात्री इराणवर हल्ल्याची धमकी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा खात्मा करण्याची धमकी दिली आहे. आज बुधवारी रात्री इराणवर मोठ्या प्रमाणात विनाशकारी हल्ला करणार असा इशारा दिला गेला आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांच्यासोबत बैठकीच्या आधी ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी इराणला इशारा दिला. आज बुधवारी रात्री इराणावर अमेरिकेनं सैन्य मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव आणि मिसाईलचा मारा करेल.
आधीच अमेरिकेनं इराणमधील ८० पेक्षा जास्त ठिकाणावर हल्ले करून परिसर उद्धवस्त केला आहे. तसंच तेहरानच्या भूमिकेवरूनही ट्रम्प यांनी आता हल्ले थांबवले जाणार नाही, असे संकेत दिले आहे. त्यामुळेच बुधवारी रात्री खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव होणार असून यामुळे होमुर्ज सामुद्रधुनीमध्ये तणाव निर्माण होणार आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता इराणाने पुन्हा एकदा होमुर्ज सामुद्रधुनीमध्ये दादागिरी सुरू केली आहे. इराणच्या फार्स न्यूज संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या IRGC ही वारंवार ओमानी कॉरिडोरचा वापर करून जहाजांवर नजर ठेवत आहे. जसे इंधनाने भरलेली जहाज हे येताना दिसले की, इराणचं सैन्य हे रेडिओवरून जहाजाच्या कॅप्टनला मागे फिरण्याची धमकी देतात. लगेच ओमन किंवा यूएनच्या मार्गाने जहाज वळवण्यासाठी सांगतात. त्यामुळे भारतीय जहाजाला आपला मार्ग बदलावा लागला. भारतीय जहाजचं नाहीतर इतर जहाजांसोबतही असेच प्रकार घडत आहे. त्यामुळे इथं कमालीची तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Mumbai,Maharashtra
Iran US War Restart: संपूर्ण जगाला भरली धडकी, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणाला विनाशाची धमकी, रात्री भयंकर घडणार?
