Mumbai: ‘वाचवा, मला वाचवा’ बेस्ट बस मागे आली आणि ‘तो’ अडकला, अंगावर शहारे आणणारा VIDEO | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

मुंबईतील भांडुपच्या कोकणनगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ बेस्ट बसचा सकाळी विचित्र अपघात झाला. ही एक इलेक्ट्रिक बस होती.

News18
News18

मुंबई : मुंबईमध्ये मरण हे स्वस्त झालं काय? असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे, कुठे झाडं पडून, कुठे मॅनहोलमध्ये पडून तर कुठे बसखाली चिरडून हकनाक निष्पाप लोकांचा जीव जात आहे. घराबाहेर गेलेला माणूस परत घरी परतेल का, अशी परिस्थितीत सध्या मुंबईत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या बेस्ट बसला अपघात झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भांडुपमध्ये एक बस अनियंत्रित होऊन अपघात झाला. या अपघातात एक प्रवाशी अडकला होता, त्याला मुंबईकरांनी एकीचं बळ दाखवून वाचवलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबईतील  भांडुपच्या कोकणनगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ बेस्ट बसचा सकाळी विचित्र अपघात झाला. ही एक इलेक्ट्रिक बस होती. चालकाचं अचानक बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस वेगात पुढे गेली. यावेळी बसने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर समोर येईल त्या वाहनांना धडक दिली. जेव्हा ही बस मागे घेण्यात आली होती, त्यावेळी एक प्रवासी हा बसच्या मागे अडकला. मागे एक झाडं लावण्यासाठी मोठी कुंडी होती. बस आणि या कुंडीच्यामध्ये हा प्रवासी अडकला होता. ‘वाचवा वाचवा” म्हणून त्याने आरडाओरडा केला. तेव्हा उपस्थितीत लोकांनी धाव घेतली. काही जण बसचालकाला बस पुढे घेण्यासाठी सांगण्यासाठी गेले.

पण, परिस्थितीत बिकट होती, बस काही केल्या सरकत नव्हती, त्यामुळे उपस्थितीत लोकांनी पाठीमागून बसला धक्का मारला. एक एक करून अनेक जण एकटवले आणि बसला जोरात धक्का मारला. त्यानंतर या प्रवाशाची सुटका झाली. या दुर्घटनेमध्ये मात्र, या प्रवाशाच्या पायाला दुखापत झाली आहे. या प्रवासाला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या अपघातात अनेक वाहनांचेही नुकसान झालं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *