Ind vs Eng 3rd T20 : चूक तीच, जखमही तीच… वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी; जोफ्रा आर्चरच्या तिसऱ्या षटकात नेमकं काय घडलं?, टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम!


Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 3rd T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी अवघ्या 13 धावा करून बाद झाला. या सामन्यात त्याने दोन षटकारांच्या मदतीने 13 धावा केल्या. आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि अवघ्या 13 धावांवर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

वैभवने पुन्हा एकदा केली तीच चूक (Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 3rd T20)

या खेळीदरम्यान वैभवने पुन्हा एकदा तीच चूक केली, ज्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. विशेष म्हणजे, जोफ्रा आर्चरच्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला षटकार ठोकला होता, मात्र त्याच गोलंदाजाच्या रणनीतीत अडकून त्याने आपली विकेटही गमावली.

अशा प्रकारे झाला OUT

सामन्यातील तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने वैभव सूर्यवंशीला बाद केले. यापूर्वी आर्चरने इशान किशनविरुद्ध तीन चेंडू टाकले होते. षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही, तर दुसरा चेंडू 146 किमी प्रतितास वेगाचा होता, ज्यावर इशान किशनने चौकार मारला. तिसरा चेंडूही वेगवान होता, ज्यावर इशानने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळून एक धाव घेतली. यानंतर चौथ्या चेंडूवर आर्चरने 144 किमी प्रतितास वेगाने शॉर्ट पिच चेंडू टाकला, जो लेग साइडच्या दिशेने जात होता. सूर्यवंशीने चेंडूचा पाठलाग करत पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटची बाहेरील कडा लागली. यष्टिरक्षक जोस बटलरने कोणतीही चूक न करता एक उत्कृष्ट झेल घेत सूर्यवंशीची खेळी संपुष्टात आणली.

पहिल्या षटकातही टाकला होता असाच चेंडू (Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 3rd T20)

वैभव सूर्यवंशी जोफ्रा आर्चरचा हा तिसरा चेंडू खेळत होता. यापूर्वी त्याने डावाच्या पहिल्या षटकातील पाचवा चेंडू खेळला होता, जो बाऊन्सर होता आणि त्यावर कोणतीही धाव झाली नव्हती. त्यानंतरचा पुढचा चेंडू 146 किमी प्रतितास वेगाने ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट टाकला गेला, ज्यावर सूर्यवंशीने शानदार षटकार ठोकला होता. मात्र, तिसऱ्या षटकात जेव्हा तो पुन्हा आर्चरच्या समोर आला, तेव्हा इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने चेंडू त्याच्या शरीराच्या थोडा जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला. सूर्यवंशीला यापूर्वीही अशा चेंडूंविरुद्ध खेळताना अडचणी आल्या आहेत आणि या वेळीही त्याच्याकडून तीच चूक झाली. परिणामी, त्याला आपली विकेट गमावून मैदान सोडावे लागले.

टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारताचा हा दुसरा पराभव आहे. भारतीय संघाला 125 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 201 धावा केल्या होत्या, तर 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 76 धावांवर गारद झाला. या पराभवासोबतच भारतीय संघाच्या नावावर काही नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याशिवाय, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे की, टीम इंडियाला सलग पाच टी-20 सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही.

हे ही वाचा –

IND vs ENG 3rd T20 : कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना…





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *