Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO


Vasai Virar Rain Local Train Updates: वसई-विरार शहरात (Vasai Virar Rain) झालेल्या विक्राळ अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. सुरुवातीला गुडघाभर असलेले पाणी काही तासांतच कंबरभर पोहोचले आणि वसई, नालासोपारा व विरारमधील हजारो नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्रीज, अन्नधान्य तसेच घरातील इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो दुचाकी आणि चारचाकी नादुरुस्त झाल्या. दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेकांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. (Vasai Virar Flood)

गेल्या दोन दिवसांपासून वसई आणि नालासोपारा या रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर पावसाचं पाणी साचल्यामुळे लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. काल सकाळी काही लोकल चालवल्या गेल्या. परंतु पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे वसई ते विरार तर विरार ते वसई या दरम्यानची लोकल सेवा आजही पूर्णपणे ठप्प आहे. पाणी कमी झाल्यानंतर या दरम्यानची लोकल सेवा सुरळित होईल. मात्र वसई रेल्वेस्थानकावर गेल्या अनेक तासांपासून प्रवासी अडकून होते. यावेळी अनेक प्रवासी रेल्वे रुळांवरुन चालत वसईवरुन नालासोपारा आणि विरारपर्यंत पोहोचले. याचदरम्यान, रात्रीही लोक रेल्वे रुळांवरुन चालत घरी जात होते. मोबाईलचा टॉर्च सुरु ठेऊन लोंढाच्या लोंढा रेल्वे रुळांवरुन चालताना दिसून येत आहे. मध्यरात्री साधारण 2 वाजेपर्यंत प्रवासी वसई ते विरार दरम्यान रेल्वे रुळांवरुन चालत होते. यादरम्यानचे अंगावर काटा येणारे काही व्हिडीओ समोर आले आहेत. (Vasai Virar Rain Local Train Updates)

वसई आणि विरार रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवाशांना रुळांवरुन प्रवास, धडकी भरवणारा VIDEO: (Virar Local Train Marathi News)

वसई आणि विरारमधील संपूर्ण वाहतूक व्यवस्थाही कोलमडली- (Vasai Virar Rain)

पूरपरिस्थितीमुळे वसई आणि विरारमधील संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रिक्षा, एसटी आणि पालिकेची परिवहन सेवा ठप्प झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना बाहेर पडणेही अशक्य झाले. गंभीर आजारी रुग्णांपर्यंत ॲम्बुलन्स पोहोचू शकत नसल्याने काही सेवाभावी संस्थांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले, तर अनेक नागरिकांचे रेस्क्यू करण्यात आले. वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने राजावली, भोयदापाडा, कामण, चिंचोटी, वाघराळपाडा, मधुबन, विरार आदी भागांत बचावकार्य राबवत अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान, 48 तास उलटूनही अनेक भागांत आजही  वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. वीज नसल्याने सोसायट्यांमधील पाण्याचे पंप बंद असून पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहासाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवाही अनेक भागांत बंद असल्याने नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. इन्व्हर्टरची बॅटरी संपल्याने मोबाईल चार्ज करणेही शक्य नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. (Vasai Virar Rain News)

राज्यातील पावसाच्या महत्वाच्या घडामोडी, VIDEO:





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *