खडकवासला धरणात 94 टक्के पाणीसाठा, रात्री 12 वाजल्यापासून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु होणार, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन 


Pune : मुंबईसह पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या मुसळधार पावसामुळं खडकवासला धरणातील पाणीसाठा सध्या 1.84 TMC (94 टक्के) झाला असून धरण 100 टक्के भरण्यासाठी केवळ 130 Mcft पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज ठीक रात्री.12 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 808 क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता 

धरणातील प्रत्यक्ष आवक, पर्जन्यमान व हवामानाचा सतत आढावा घेऊन आवश्यकतेनुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल परिस्थितीनुसार रात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान 5000 ते 8000 क्युसेक्स पर्यंत विसर्ग करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. 

धरण आज रात्री पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरण्याची शक्यता

खडकवासला धरणातील पाणीसाठा सध्या 1.84 TMC (94 टक्के) झाला असून धरण 100 टक्के भरण्यासाठी केवळ 130 Mcft पाण्याची आवश्यकता आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून अंदाजे 10 मिमी पर्जन्यानंतर सुमारे 30 Mcft प्रति तास इतकी पाण्याची आवक होत आहे. विद्यमान पर्जन्यस्थिती कायम राहिल्यास धरण पुढील सुमारे 4 तासांत (अंदाजे रात्री 2.30 वाजेपर्यंत) पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर अचानक मोठा विसर्ग करावा लागू नये तसेच खालच्या प्रवाहात नियंत्रित व सुरक्षित परिस्थिती राखता यावी, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज रात्री 12.00 वाजल्यापासून खडकवासला धरणातून 800 क्युसेक्स विसर्ग नदीत सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतर धरणातील प्रत्यक्ष आवक, पर्जन्यमान व हवामानाचा सतत आढावा घेऊन आवश्यकतेनुसार विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल.

कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने येवा वाढत आहे. कासारसाई धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करणेसाठी कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात सुरु असणारा  4194 क्युसेक्स इतका विसर्ग वाढवून 6216  क्युसेक्स करण्यात आलेला आहे. पाऊस चालू/वाढत  राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *