फुटबॉलचा ‘नवा सुलतान’, मेस्सीची पेनल्टी अडवणारा कोण आहे मोस्तफा शोबेर? त्या एका झेपेत अर्जेंटिना घायाळ | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

Egypt Goalkeeper Mostafa Shobeir: फिफा विश्वचषक 2026च्या प्री-क्वार्टरफायनलमध्ये इजिप्तचा गोलरक्षक मोस्तफा शोबेर याने लिओनेल मेस्सीची पेनल्टी रोखत अर्जेंटिनाला मोठा धक्का दिला.

News18
News18

अटलांटा: फिफा विश्वचषक 2026च्या प्री-क्वार्टरफायनलमध्ये अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला मोठा धक्का बसला. इजिप्तविरुद्धच्या सामन्यात त्याने घेतलेली पेनल्टी इजिप्तचा गोलरक्षक मोस्तफा शोबेर याने शानदार बचाव करत परतवून लावली. या स्पर्धेतील मेस्सीची ही दुसरी पेनल्टी हुकली असून शोबेरच्या अप्रतिम गोलरक्षणामुळे अर्जेंटिनाला सुरुवातीलाच मोठा फटका बसला. पहिल्या हाफनंतर इजिप्तने विश्वविजेत्या अर्जेंटिनाविरुद्ध 1-0 अशी महत्त्वाची आघाडी घेतली आहे.

अमेरिकेतील अटलांटा येथे सुरू असेलल्या या सामन्यात मेस्सीने पेनल्टी घेतली. मात्र शोबेरने डाव्या बाजूला झेपावत चेंडू अडवला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोष उसळला.

विश्वचषकातील दुसरा पेनल्टी बचाव

मोस्तफा शोबेरसाठी ही केवळ एक पेनल्टी वाचवण्याची घटना नव्हती. या विश्वचषकातील हा त्याचा दुसरा यशस्वी पेनल्टी बचाव ठरला आहे. यापूर्वी साखळी फेरीत त्याने इराणचा आघाडीचा खेळाडू मेहदी तारेमी याची पेनल्टीही रोखली होती. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा प्रतिस्पर्धी संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूला रोखण्यात शोबेर यशस्वी ठरला.

अर्जेंटिनाचे अनेक हल्ले निष्फळ

मेस्सीची पेनल्टी रोखल्यानंतरही शोबेरचा उत्कृष्ट खेळ कायम राहिला. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाचे अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर आणि ज्युलियन अल्वारेझ यांनी जवळून गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र शोबेरने दोन्ही वेळा अचूक बचाव करत इजिप्तची आघाडी कायम राखली. त्याच्या भक्कम गोलरक्षणामुळे अर्जेंटिनाला अनेक संधी असूनही गोल करता आला नाही.

क्लब आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्द

मोस्तफा शोबेर 2020 पासून इजिप्तमधील नामांकित क्लब अल अहलीकडून खेळत आहे. आतापर्यंत त्याने क्लबसाठी 63 सामने खेळले आहेत. इजिप्तच्या राष्ट्रीय संघासाठी त्याने 14 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून विश्वचषकातील कामगिरीमुळे त्याची ओळख जागतिक स्तरावर अधिक मजबूत झाली आहे.

वडिलांचाही विश्वचषकाचा वारसा

मोस्तफा शोबेरचा फुटबॉलशी संबंध कौटुंबिक आहे. त्याचे वडील अहमद शोबेर हे देखील इजिप्तचे माजी गोलरक्षक होते. त्यांनी 1990 च्या फिफा विश्वचषकात इजिप्तचे प्रतिनिधित्व केले होते. आता मुलगा मोस्तफा शोबेरही विश्वचषकात चमकदार कामगिरी करत वडिलांचा वारसा यशस्वीपणे पुढे नेत आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

फुटबॉलचा ‘नवा सुलतान’, मेस्सीची पेनल्टी अडवणारा कोण आहे मोस्तफा शोबेर? त्या एका झेपेत अर्जेंटिना घायाळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *