जयंत पाटील आणि विनोद तावडेंच्या भेटीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येण्याची चर्चा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रतिक्रिया समोर


मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडेंची मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी होण्याच्या किंवा एनडीएच्या वाटेवरती आहे का या चर्चांना उधळ आलय. शरद पवारांचा पक्ष हा महायुतीमध्ये सहभागी झाला तर पक्षाच्या वाट्याला नेमकं काय येऊ शकतं याविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडन मिळाली आहे. जयंत पाटील यांनी भेट झाल्याचं मान्य केलं असलं तरी चर्चेतील तपशीलाबाबत काही भाष्य केलं नाही.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनात नेमकं काय सुरू आहे? एनडीए मध्ये किंवा महायुतीत सहभागी होण्यासंदर्भातली भेट होती का? यासंदर्भातील चर्चा सुरु आहेत. या सर्व घडामोडींवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सुनील तटकरे काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर सुरु झालेल्या चर्चांसंदर्भात भाष्य केलं.  ते म्हणाले की मला या विषयाबद्दल काही माहित नाहीय. आदरणीय पवार साहेब गेली सहा दशक देशाच्या राजकारणामध्ये त्यांनी आपले वेगळं स्थान प्रचंड राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर, मेहनतीतून विकासमुख नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाने काय निर्णय घ्यावा हा अधिकार शेवटी साहेबांचा आणि त्या पक्षाच्या नेतृत्वाचा आहे, असं सुनील तटकरे म्हणाले. 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

दत्तात्रय भरणे म्हणाले की आता या बाबतीमध्ये मला काहीच कल्पना नाही. विनोद तावडे साहेब हे खूप वरिष्ठ नेते आहेत. जयंत पाटील साहेब सुद्धा खूप वरिष्ठ नेते आहेत शेवटी. हे दोन्ही वरिष्ठ नेते असून खूप दिवस दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. कदाचित दोघांनी एकत्रित काम केलेलं असल्यामुळे त्यांचं एक मैत्रीच नात असेल. त्यांचं पक्षविरत मैत्रीच नातं आहे ,त्यामुळे ते कदाचित भेटले असावेत, असं दत्तात्रय भरणे म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्रातन एनडीएमध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आता एनडीएमध्ये येण्याची आमची कुठली चर्चा नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *