Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल


Facebook Dindis New Devotional Song Viral: फेसबुक दिंडी (Facebook Dindi) या यूट्यूब चॅनलवर (Youtube Channel) कायम भक्तीमय गाणी रिलीज केली जातात.  ही गाणी ऐकून  श्रोते भक्तीरसात तल्लीन होतात. फेसबुक दिंडीच्या यावर्षीच्या बहुप्रतिक्षित नवीन गाण्याचे पोस्टर आणि टीझर लाँच करण्यात आले आहे.  या गाण्याचा लाँच सोहळा महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितराव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हा खास सोहळा बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या विशेष प्रसंगी फेसबुक दिंडीची संपूर्ण टीम उपस्थित होती. तसेच फेसबुक दिंडीचा लाडका चेहरा छोटा वारकरी देखील या सोहळ्याचा विशेष साक्षीदार ठरला. छोटा वारकरीनेही या संपूर्ण कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला. या कार्यक्रमाला फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे, तसेच पूजा मोरे, वारी मोरे, वैष्णव मोरे, सुमित चव्हाण आणि शिवम कदम हे उपस्थित होते. फेसबुक दिंडीच्या यावर्षीच्या नव्या गाण्याचे शीर्षक, ‘रामकृष्ण हरी, जय शिवराय’ असे आहे. 

यावर्षी फेसबुक दिंडी घेऊन येत आहे एक आगळीवेगळी संकल्पना – भक्तीशक्ती (Sunetra Pawar launches the teaser and poster of Facebook Dindis upcoming Song)

वारकरी संप्रदायातील भक्तीचा निर्मळ भाव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी शिवशक्तीचा अद्भुत संगम या गाण्यात अनुभवायला मिळणार आहे. भक्ती, पराक्रम, संस्कार आणि प्रेरणा यांचा सुंदर मिलाफ असलेली ही एक संगीतमय कलाकृती ठरणार आहे. या गाण्याचे शब्द लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले असून, त्यांच्या प्रभावी लेखणीतून या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त झालीये.

या गाण्याला स्वर महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अवधूत दादा गांधी आणि प्रसिद्ध शाहीर शाहीर चंद्रकांत माने यांचे लाभले आहे.  विशेष म्हणजे या सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी संपूर्ण गाणे अतिशय लक्षपूर्वक ऐकले होते. गाण्याची संकल्पना, शब्द, संगीत आणि सादरीकरण यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. फेसबुक दिंडीचे हे नवीन गाणे प्रेक्षकांसाठी एक वेगळी, प्रेरणादायी आणि भक्तिमय संगीतमय मेजवानी ठरणार असून, भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय मिलाफ यात अनुभवायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बाबांपासून विभक्त, आईच्या वागण्यात रहस्यमय बदल अन्… ‘ही’ हॉरर फिल्म एकट्याने पाहू नका, अंगावर काटा अन्…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *