Siya Goyal Pune Crime: 20 वर्षांच्या सिया गोयलचं प्लॅनिंग ऐकून चौकशी करणारे पोलीसही हादरले, कसलेल्या वकिलालाही लाजवेल असा अभ्यास, नेमकं काय घडलं?


Siya Goyal Pune Crime: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात दररोज नवी आणि चक्रावणारी माहिती समोर येताना दिसत आहे. केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder Case) हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचे लग्न सिया गोयल हिच्यासोबत ठरले होते. मात्र, सियाचे चेतन चौधरी (Chetan Chaudhari) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याने या दोघांनी केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून ठार मारले होते. सध्या सिया गोयल (Siya Goyal_ आणि चेतन चौधरी हे दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांकडून या दोघांची कसून चौकशी सुरु आहे. यावेळी सिया गोयलने केतनला मारण्याच्या कटाबाबत दिलेली कबुली आणि त्याचे प्लॅनिंग ऐकून चौकशी करणारे पोलीसही चक्रावून गेले आहेत. (Pune Crime news)

सिया गोयल हिने केतन अग्रवाल याला मारण्यापूर्वी हत्या कशी करायची, पकडले गेल्यास काय करायचे, याचा नीट सखोल अभ्यास केला होता. यासाठी तिने गुगलवरील माहिती, वेब सिरीज आणि काही पॉडकास्ट पाहिले होते. अवघ्या 20 वर्षांची सिया गोयल ही एखाद्या कसलेल्या गुन्हेगाराप्रमाणे विचार करु शकते, हे पाहून पोलिसांनाही चांगलाच धक्का बसला आहे.

सिया  गोयल हिला केतनची हत्या केल्यानंतर आपण पकडले जाऊ शकतो, याची भीती होती. त्यामुळे तिने अगोदरच या सगळ्याचा अभ्यास केला होता. महिला गुन्हेगारांना पोलीस कोठडीत कशी वागणूक मिळते, महिला आरोपींना मारहाण होते का, याबद्दल सियाने बरीच माहिती गोळा  केली होती. 20 वर्षांची मुलगी किती गुन्हेगारी स्वरुपाचा विचार करु शकते, हे यानिमित्ताने समोर आले आहे.  हत्या केल्यानंतर पोलीस अटक करतील, तेव्हा आपल्यासोबत काय घडू शकतं? एकदा अटक झाल्यावर हत्येच्या गुन्ह्यात जामीन किती दिवसांनी आणि कसा मिळतो? याची माहिती  सियाने गोळा केली होती. यासाठी तिने देशभरात गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याप्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशी हिने जामीन कसा मिळवला होता, तसा जामीन आपल्यालाही मिळू शकतो का, याची तपशीलवर माहिती गोळा केल्याचे आता समोर आले आहे.

आणखी वाचा

Ketan Agarwal and Siya Goyal: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलचा क्राईम वेबसिरीज पाहून रिसर्च, गुगलवरील सगळी माहिती धुंडाळली, अखेर लोहगडावरुन ढकललं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *