बोटने भारतीय बाजारपेठेत त्यांचा नवीन पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर स्टोन 900, सादर केला आहे. हा स्पीकर विशेषतः मोठा आवाज, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि घराबाहेर वापरण्यासाठी चांगला पर्याय शोधणाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा स्पीकर घरगुती पार्ट्या, प्रवास आणि सहल यांसारख्या ठिकाणी एक उत्कृष्ट ऑडिओ अनुभवा येईल. चला तर मग आजच्या लेखात आपण या स्पीकरची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.
80 वॅट साउंडसह दमदार कामगिरी
Boat Stone 900 मध्ये 80 वॅटचा ऑडिओ आउटपुट आहे. ज्यामुळे हा स्पीकर मोठा आणि स्पष्ट आवाज देऊ शकतो. यात ड्युअल ड्रायव्हर्स आणि वेगळ ट्वीटर आहेत, जे म्युजिक, चित्रपट आणि इतर ऑडिओ फाइल्स ऐकताना उत्कृष्ट साउंड क्वॉलिटी देतात. जर तुम्ही मोठ्या आवाजाचा स्पीकर शोधत असाल, तर हे मॉडेल एक चांगला पर्याय असू शकतो.
म्युजिकनुसार लाईट्स होतील चेंज
या स्पीकरमध्ये RGB लायटिंगची सुविधा देखील आहे, जी गाण्याच्या तालाप्रमाणे रंग बदलतात. यामुळे पार्टीचे वातावरण आणखी चांगले होते.
पाण्यापासून सुरक्षित राहील
बोट स्टोन 900 ला IPX5 रेटिंग आहे. ज्यामुळे थोड्या ओलाव्यापासूनही सुरक्षित राहील. तथापि हा स्पीकर स्विमिंग पूलमध्ये किंवा पावसात वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी
या स्पीकरमध्ये ब्लूटूथ 5.3 आहे, ज्यामुळे तो स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपला सहजपणे जोडता येतो. यात AUX आणि USB चेही समर्थन आहे, ज्यामुळे गाणं ऐकण्यासाठी विविध पद्धती वापरता येतात.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, एकदा चार्ज केल्यावर स्पीकर अंदाजे 15 तास चालू शकतो. तथापि बॅटरी लाईफ, आवाज, आरजीबी लायटिंग आणि वापराच्या पद्धतींवर अवलंबून असेल.
किंमत आणि उपलब्धता
बोट स्टोन 900 या स्पीकरची किंमत 5 हजार 999 रूपये इतकी आहे. तथापि लाँच ऑफरचा भाग म्हणून ॲमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान हा स्पीकर तुम्ही 4 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच हा स्पीकर ग्राफाइट ब्लॅक (Graphite Black)आणि जंगल टेरेन (Jungle Terrain)रंगांमध्ये उपलब्ध आहे.
तुम्ही हा स्पीकर बोटच्या अधिकृत वेबसाइट, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. जर तुम्ही कमी किमतीत एक हाय-पॉवर ब्लूटूथ स्पीकर शोधत असाल, तर बोट स्टोन 900 हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचा दमदार आवाज, दीर्घ बॅटरी लाईफ आणि अनेक कनेक्टिव्हिटी पर्याय या किमतीत त्याला आकर्षक बनवतात.