Shapoor Zadran Passes Away : क्रिकेट विश्वाला हादरवून टाकणारी घटना! वाढदिवसाच्या एक दिवसाआधी अफगाणिस्तानच्या स्टार गोलंदाजाचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Afghanistan fast bowler Shapoor Zadran passes away at 38 : अफगाणिस्तान क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शापूर जादरान याचे दीर्घ आजारामुळे भारतात निधन झाले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या वाढदिवसाच्या अगदी एक दिवस आधी ही दुर्दैवी घटना घडल्याने क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. शापूर जादरान हा हेमोफॅगोसिटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस (HLH) या अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंजत होता. या आजारात मानवाची रोगप्रतिकारक शक्ती प्रमाणाबाहेर सक्रिय होते आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांनाच इजा पोहोचवू लागते. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर ग्रेटर नोएडा येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

अफगाण क्रिकेटचा शिल्पकार

शापूर जादरान हा अफगाणिस्तान क्रिकेटच्या त्या पहिल्या पिढीतील खेळाडू होता, ज्यांनी आपल्या अथक परिश्रमांनी देशाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले. त्याच्या डावखुऱ्या वेगवान आणि आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. त्याने 2009 ते 2020 या काळात अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने 44 एकदिवसीय (ODI) आणि 36 आंतरराष्ट्रीय टी-20 असे एकूण 80 सामने खेळले. अफगाणिस्तान संघाला आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि टी-20 श्वचषकासाठी पात्र ठरवण्यात आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. म्हणूनच त्याला अफगाण क्रिकेटच्या यशाचा प्रमुख शिल्पकार मानले जाते.

दीर्घ आजाराशी झुंज (Shapoor Zadran passes away after a long illness)

शापूर जादरानच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शापूरची प्रकृती खालावली होती. त्यानंतर अफगाणिस्तानमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील आणि विशेष उपचारांसाठी भारतात आणण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात अफगाणिस्तानचे स्टार क्रिकेटपटू रशीद खान आणि मोहम्मद नबी यांनी ग्रेटर नोएडातील रुग्णालयात जाऊन शापूरची भेट घेतली होती आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

शापूर झद्रानच्या निधनानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) तीव्र दुःख व्यक्त केले असून, क्रिकेट जगतातून त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली जात आहे. खेळपट्टीवरील त्याचा आक्रमक अंदाज आणि मैदानाबाहेरचा त्याचा मनमिळावू स्वभाव नेहमीच चाहत्यांच्या स्मरणात राहील.

हे ही वाचा – 

IND vs ENG 3rd T20 Playing XI : एक खराब मॅच अन् थेट संघाबाहेर… तिसऱ्या टी-20 सामन्यातून स्टार खेळाडू OUT? अशी असेल टीम इंडियाची खतरनाक Playing XI





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *