Cricketer Dies : मेंदूपर्यंत इन्फेक्शन अन् ऑस्ट्रेलियाला घाम फोडणाऱ्या स्टार क्रिकेटरचं 38 व्या वर्षी निधन! दिल्लीत घेतला अखेरचा श्वास | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

Afghanistan cricketer Shapoor Zadran Passes Away : अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर झाद्रान याचे वयाच्या 38 व्या वर्षी भारतात निधन झालं आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शापूर झाद्रान याच्या मृत्यूची माहिती दिली.

Shapoor Zadran Passes Away In New Delhi Hospital
Shapoor Zadran Passes Away In New Delhi Hospital

Shapoor Zadran Passes Away : गेल्या काही दिवसांपासून मृत्यूला झुंज देणाऱ्या अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर झाद्रान याचे वयाच्या 38 व्या वर्षी भारतात निधन झालं आहे. तो ‘हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस’ या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित गंभीर आजाराशी दीर्घकाळ लढा देत होता. त्यानंतर आता त्याची प्राणज्योत मावळली. निधनापूर्वी काही महिने त्याच्यावर दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्यासाठी अफगाणिस्तानचे खेळाडू प्रार्थना आणि मदत देखील करत होते. अशातच आता संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये शोककळा पसरली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली मृत्यूची बातमी

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शापूर झाद्रान याच्या मृत्यूची माहिती दिली. ‘आपल्या कारकिर्दीत शापूरने सन्मान, धैर्य आणि अभिमानाने अफगाणिस्तान क्रिकेटची सेवा केली. त्याचे योगदान आणि यश हे अफगाणिस्तान क्रिकेटच्या इतिहासाचा नेहमीच एक महत्त्वाचा भाग राहतील आणि राष्ट्रीय संघासाठी त्याने केलेले प्रयत्न कधीही विसरले जाणार नाहीत’, असं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.

कोण होता शपूर जादरान?

अफगाणी क्रिकेटर शपूर जादरानच्या क्रिकेट करिअरबदद्ल बोलायचं झालं तर त्याने 2009 मध्ये नेंदरलँड विरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. जादरान यांनी त्यांच्या 80 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 44 वनडे आणि 36 टी20 सामन्यांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये जादरानने 44 विकेट काढल्या आहेत.ज्यामध्ये त्याचा सर्वश्रेष्ट प्रदर्शन 4/24 होता. तर टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावापर 27 विकेट आहेत आणि 3/40 सर्वश्रेष्ट प्रदर्शनाचा आकडा आहे. दरम्यान जादरानने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. जादरानने आपल्या करिअरमध्ये स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, केन विल्यमसन आणि तिलकरत्न दिलशान सारख्या दिग्गज खेळाडूंची विकेट घेतली होती.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

Cricketer Dies : मेंदूपर्यंत इन्फेक्शन अन् ऑस्ट्रेलियाला घाम फोडणाऱ्या स्टार क्रिकेटरचं 38 व्या वर्षी निधन! दिल्लीत घेतला अखेरचा श्वास



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *