Doordarshan Ramayan Actor Struggle Story: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 4000 कोटींच्या ‘रामायण’ची (Ramayana) सध्या जोरदार चर्चा आहे. पण, अजूनही रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या दूरदर्शनवरच्या ‘रामायण’ची’ क्रेझ कायम आहे. याच रामायणातील एका स्टार कलाकाराबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. त्यांचं नाव चंद्रशेखर वैद्य (Chandrashekhar Vaidya). हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Film Industry) ज्येष्ठे अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचा जन्म 7 जुलै 1922 रोजी झालेला. तेलंगणा इथे जन्मलेल्या या बहुआयामी कलाकारानं केवळ अभिनयातच नव्हे, तर चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या क्षेत्रांतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी 110 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. त्यांचं बालपण हैदराबादचा सांस्कृतिक वारसा आणि निजामाच्या राजवटीच्या पार्श्वभूमीवर गेलं. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. 1940 मध्ये ते मुंबईला आले आणि सिनेसृष्टीत दाखल झाले. गायिका शमशाद बेगम यांच्या शिफारशीवरून त्यांनी पुण्यातील शालीमार स्टुडिओमध्ये काम करायला सुरुवात केली.

अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांची कारकीर्द (Doordarshan Ramayan Actor Chandrashekhar Struggle Story)
1950 मधील ‘बेबस’ सिनेमातून त्यांनी ‘ज्युनिअर आर्टिस्ट’ म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि हळूहळू सहाय्यक भूमिकांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. अभिनेता म्हणून त्यांनी 1953 मधील ‘सुरंग’ सिनेमात काम केलं. त्यानंतर, ‘काली टोपी लाल रुमाल’, ‘बारादरी’, ‘वसंत बहार’, ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘फॅशन’, ‘बरसात की रात’, ‘अंगुलिमाल’, ‘रुस्तम-ए-बगदाद’ आणि ‘जहाँ आरा’ अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्यात.
1964 मध्ये, चंद्रशेखर वैद्य यांनी ‘चा चा चा’ (Cha Cha Cha) सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं, तसेच त्यात मुख्य भूमिकाही साकारली. त्यानंतर त्यांनी ‘स्ट्रीट सिंगर’ (Street Singer) सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलंय. 1960 च्या दशकाच्या अखेरीस मुख्य भूमिका मिळणं दुर्मिळ होऊ लागल्यानं, चंद्रशेखर यांनी चरित्र अभिनेत्याच्या (Character Actor) भूमिकेकडे वळण घेतलंय. त्यांनी एकूण 110 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ महागाथेवर आधारित मालिकेत ‘आर्य सुमंत’ यांची भूमिका साकारल्यामुळे चंद्रशेखर वैद्य यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी ही भूमिका साकारलेली आणि त्यांची ती कामगिरी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे.
चंद्रशेखर यांनी 1985 ते 1996 या काळात ‘सिने आर्टिस्ट्स असोसिएशन’चे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि सिनेसृष्टीतील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सक्रिय भूमिका बजावली. सन 2000 मध्ये ‘खौफ’ सिनेमानंतर त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली. चंद्रशेखर यांचा विवाह वयाच्या 13 व्या वर्षी झाला होता. त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असली, तरी ते केवळ सातवीपर्यंतच शिकू शकले. त्यांनी अत्यंत साधं जीवन जगलं. त्यांचे पुत्र अशोक शेखर हे टीव्ही निर्माते आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :