Sharad Pawar : शरद पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पवारांच्या विश्वासू नेत्याची भाजपच्या बड्या नेत्यासोबत बैठक – Marathi News | After blow to uddhav Thackeray now Sharad Pawar ncp could join bjp led nda alliance in center and mahayuti govt in Maharashtra


महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघणार आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले होते. आता तसं काही होणार नाहीय. पण पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरु आहे. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत जाण्यासंबंधी दोन मतप्रवाह असल्याच्या बातम्या सुरु आहेत. एकागटाला सत्ताधारी बाकावर बसायचं आहे, दुसऱ्या गटाला विरोधी पक्षात. पण आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाणार अशा जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेत 10 आमदार आहेत, 8 खासदार आहेत. शरद पवारांनी या सर्व आमदार, खासदारांसोबत बोलण्याची जबाबदारी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर सोपवल्याची चर्चा आहे.

त्या शिवाय भाजपसोबत वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याची जबाबदारी सुद्धा एका नेत्यावर दिल्याची माहिती आहे. भाजपसोबत जायचं की नाही? या बाबत आमदार-खासदारांची मतं जाणून घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडी घडणार आहेत. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती आहे.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *