Last Updated:
स्लॅब कोसळल्यानंतर खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि
मुंबई: मुंबईमध्ये पावसाने धुमशान घातलं आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं आहे, अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडला आहे. अशातच बोरिवली पूर्व इथं मेट्रो मॉलसमोर एका इमारतीचं बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये काही वाहनं अडकली असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली पूर्व इथं मुसळधार पावसादरम्यान मेट्रो मॉलसमोरील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत असलेल्या चांदक बिल्डर्सच्या बांधकाम सुरू आहे. सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे या प्रकल्पातील एक स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील बोरिवलीमध्ये मेट्रो मॉलसमोर बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातला स्लॅब कोसळला, वाहनं अडकली#Mumbairain pic.twitter.com/TbP3V540R1
— News18 Marathi (@News18_marathi) July 6, 2026
स्लॅब कोसळल्यानंतर खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)चे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
सध्या कोसळलेला स्लॅब हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, वाहनांच्या नुकसानीचा अंदाज घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे.
Mumbai,Maharashtra
Mumbai: मुंबईत पडझड सुरूच, बोरिवलीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला, घटनास्थळाचा VIDEO
