रायगडकरांची पाण्याची चिंता मिटली, जिल्ह्यातील 28 पैकी 15 धरणे ओव्हरफ्लो, धरणात 78.46 टक्के पाणीसाठा


Raigad Rain News :  मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारण अनक ठिकाणी रस्त्यावंर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. रायगड जिल्ह्यात देखील गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  जिल्ह्यातील 28 पैकी 15 धरणे 100 टक्के भरली आहे. या धरणांमध्ये 78.46 टक्के पाणीसाठा झाला आहे. 

रायगडकरांची पाण्याची चिंता मिटली 

रायगड जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळं नद्यांसह धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख 28 धरणांतील पाणी साठा सद्यस्थिती मध्ये 78.46  टक्क्यांवर पोहोचला असून  फणसाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, घोटवडे, कव्हेळे, उन्हेरे, पाभरे, संदेरी, वरंध, खिंड वाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले आणि मोरबे ही 15 धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे रायगडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी उर्वरित धरणांमध्ये देखील पाण्याची मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट दिला असून नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *