भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. या सामन्यात वैभव सुर्यवंशी खेळणार की नाही, यावर जोरदार चर्चा या रंगताना दिसत होत्या. पहिल्या सामन्यातील प्लेइंग 11 असेल अनेकांना वाटलं होतं. सामन्याला काही वेळ शिल्लक असतानाच उपकर्णधार तिलक वर्मा याने थेट वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर कॅप घातली. प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशी खेळणार हे त्यावरूनच स्पष्ट झाले. वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. वैभव सूर्यवंशीने वयाच्या 15 वर्षे आणि 99 दिवसात पदार्पण केले. आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशी याने धमाका केला. आयपीएलची जेवढी चर्चा झाली नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त पट चर्चा ही वैभव सूर्यवंशी याची झाली. त्यानंतर त्याला थेट भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळाली.
आता थेट त्याला टी20 मालिकेत प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले. तिलकने वैभवला कॅप घातल्यानंतर त्याला शुभेच्छा दिल्या. वैभव सूर्यवंशी याला 122 नंबरची कॅप देण्यात आली. कॅप मिळाल्यानंतर वैभव सूर्यवंशी याने म्हटले की, माझे हे स्वप्न होते. कोणासाठीही टीम इंडियाकडून खेळणे म्हणजे स्वप्न असते. यादरम्यानच वैभव सूर्यवंशी याने मोठा खुलासा करत म्हटले की, मी ही सर्वात मोठी गोष्टी सर्वात अगोदर रूमध्ये जाऊन माझ्या वडिलांना सांगितली.
ते माझ्यासोबत आहेत. मी सर्वात अगोदर त्यांनाच याबाबत सांगितले, अगोदर कोणालाही काहीही सांगितले नाही. रोमी भिंडर सर आणि आई जे माझ्यासोबत आहेत, त्यांना सांगितले. प सर्वात अगोदर ही गोष्टी मी माझ्या वडिलांनाच सांगितली. माझे वडील खूप आनंदी झाले. त्यांनी मला म्हटले की, जे करत आला आहेस तेच कर.. दबाव घेऊ नको… खेळावर लक्ष दे..
An incredibly special moment in the #TeamIndia camp today 🥹💙
🎥 Presenting T20I cap no. 122, Vaibhav Sooryavanshi 🧢#ENGvIND pic.twitter.com/hvOZdSN3Ow
— BCCI (@BCCI) July 4, 2026
वैभव सूर्यवंशी याने अत्यंत कमी कालावधीमध्ये क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. वैभव सूर्यवंशी याच्या खेळाचा देश वेडा झाला आहे. सचिन तेंडुलकर याचे रेकॉर्ड तोडताना वैभव सूर्यवंशी हा दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाला वैभव सूर्यवंशी याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा नक्कीच आहेत. त्यामध्येच 11 मध्ये त्याचा समावेश झाला.