Pune Rain Ashadhi Wari: पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना


Ashadi Wari 2026 Alandi: राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईपुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु असून नदीनाले आणि बहुतांश भाग जलमय झाले आहे. तर आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. अशातच राज्यातील वारकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यासह लगतच्या जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी या प्रचंड पावसामुळे इंद्रायणीला (Alandi Flood News) पूर आला आहे. परिणामी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाकडून सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे. सध्याची पूर परिस्थिती निवळेपर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला (Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Prasthan) आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन करण्या आले आहे.

Ashadi Wari 2026 : ‘ज्या ठिकाणी आहात तेथेच सुरक्षित थांबा, आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्य सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना नम्र आवाहन करण्यात आले आहे की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात तेथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. अशा सूचना दिल्या आहे.

Alandi Flood News : अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे

दरम्यान, कृपया प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Ashadi Wari 2026: वाखरी पालखी तळावर अतिक्रमण हटल्यावर मिळाली दीड एकर जागा; वारकऱ्यांसाठी होणार मुख्यमंत्री सुविधा केंद्र

आषाढी वारीसाठी सगळ्यात मोठा पालखीतळ असणाऱ्या पंढरपूर जवळच्या वाखरी पालखी तळावर धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जेसीबीच्या सहायाने अतिक्रमणे काढून तब्बल दीड एकर जागा मोकळी करण्यात वाखरी ग्रामपंचायत प्रशासनाला यश आले आहे. या दीड एकर जागेवर मुख्यमंत्री सुविधा केंद्राच्या माध्यमातून वारकरी भक्ताना वास्तव्याची सेवा निर्माण होणार आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेतून झालेल्या दीड एकर जागेचा लाभ वारकरी भक्तांना होईल.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *